- नितीन कांबळेकडा (बीड) : घराला कुलूप लावून शेत कामासाठी कुटुंब गेल्याची संधी साधत चोरट्यांनी चक्क पोलिसाचे घर फोडल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रकियाअंभोरा पोलिस ठाण्यात सुरू आहे.
आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाणे हद्दीतील केळ येथील मच्छिंद्र साधू दळवी हे शेतकरी असून मुलगा गणेश दळवी हे मुंबई येथे पोलिस दलात कार्यरत आहे. दळवी हे शनिवारी सकाळी कुटुंबासह शेतात काम करत असताना दुपारच्या दरम्यान चोरट्यांनी घरी कोणी नसल्याची संधी साधत घरफोडी केली. कपाटातून अंदाजे दहा ते बारा तोळे सोन्याची चोरी केल्याचे उघडकीस आले. अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे. घटनास्थळी श्वान पथक,ठसे तज्ज्ञ, फोरेन्सिक पथक,स्थानिक गुन्हे शाखा,अंभोरा पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे.
नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन ठाणे हद्दीतील रोडलगत वस्ती असलेले व गाव परिसरातील लोकांनी शेती कामे करताना घराला कुलूप न लावता एक व्यक्ती घरी ठेवावी. सीसीटीव्ही लावावेत. जेणे करून अशा घटनांना आळा बसेल. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी केले आहे.