शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ड्रीम ११, रमी ॲपमध्ये पैसे बुडाले; कर्ज फेडण्यासाठी बीडमध्ये सहायक फौजदार बनला चोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 11:59 IST

पोलिसच चोर! सहायक फौजदारानेच चोरल्या ७ दुचाकी आणि ५८ बॅटऱ्या

बीड : बीड पोलिस नेहमीच वादग्रस्त ठरत आहेत. वायरलेस विभागातील सहायक फौजदाराने डिसेंबर २०२४ मध्ये पोलिस अधीक्षक कार्यालयातून १२ व्होल्टच्या ५८ बॅटऱ्या चोरल्या. त्यात जामीन होताच पुन्हा सात दुचाकी चाेरल्या. ड्रीम एलेव्हन व रमी ॲपमध्ये पैसे बुडाले. लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी हा पोलिस चोर बनल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्यासोबत आणखी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने उशिरा केली.

अमित मधुकर सुतार (वय ३५, रा. खोकरमोहा, ता. शिरूरकासार), स्वराज कोंडीराम बोबडे (२६, रा. अंबिका नगर, बीड) आणि हितोपदेश गणेश वडमारे (३०, रा. अंकुशनगर, बीड) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील सुतार हा सहायक फौजदार असून, पोलिस अधीक्षक कार्यालयातील वायरलेस विभागात कार्यरत होता. २४ डिसेंबर २०२४ रोजी सुतार याने इन्व्हर्टरसाठी लागणाऱ्या १० बॅटऱ्या चोरल्या. त्याच्याविरोधात बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर अधिक तपास केल्यावर त्याच्याकडे तब्बल ५८ बॅटऱ्या निघाल्या. शिवाय एक एलईडी टीव्हीही चोरला होता. सुतारला तेव्हा अटकही झाली होती. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी त्याचे निलंबनही केले होते. तो सध्या जामिनावर होता. परंतु त्याला जुगार, दारू, ऑनलाइन जुगार, गेम खेळण्याचा छंद होता. यात त्याने हजारो रुपये गुंतवले होते. काही लोकांकडून कर्जही घेतले होते. हे पैसे परत करण्यासाठीच त्याने चोरीचा मार्ग अवलंबल्याचे सांगण्यात आले.

दुचाकी विक्रीसाठी दोघांची मदतसुतार याने बीड शहर दोन व शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीतून चार दुचाकी चोरल्या. त्या विक्रीसाठी त्याने स्वराज आणि हितोपदेश यांची मदत घेतली होती. हीच माहिती एलसीबीला मिळाली आणि त्यांनी सापळा रचून तिघांनाही बेड्या ठोकल्या. सुतारने तीन दुचाकी स्वत:च्या घरी, चार मित्राकडे लपवल्या होत्या. त्याच्याकडून आतापर्यंत सहा गुन्हे उघड झाले आहेत.

जालन्यातही पीएसआय चोरटाजालना येथेही प्रल्हाद मांटे हा चोरांच्या टोळीचा म्होरक्या असल्याचे एप्रिल २०२५ मध्ये समोर आले होते. त्यातही अहमद शेख नावाचा चोरटा बीडचाच रहिवासी होता. जालन्यानंतर बीडमध्येही पोलिसाचा चोरीच्या गुन्ह्यात सहभाग आढळल्याने खळबळ उडाली आहे.

अधिक तपास सुरू आहे तीन चोरट्यांकडून सात दुचाकी जप्त केल्या आहेत. ते सध्या बीड शहर पोलिसांच्या ताब्यात आहेत. आणखी तपास सुरूच आहे.- शिवाजी बंटेवाड, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा बीड

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याPoliceपोलिस