शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

परळी हादरली! शिकवणीवरून परतणाऱ्या महादेव मुंडेंच्या मुलाला मारहाण,पत्नीने मागितले संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 18:22 IST

महादेव मुंडे कुटुंबाला धोका? मुलाला मारहाण होताच पत्नीने मागितले संरक्षण, गृहमंत्री आणि एसपींना सुप्रिया सुळेंचे पत्र

परळी : व्यापारी महादेव मुंडे खून प्रकरणाला २८ महिने उलटूनही एकीकडे पोलिसांना आरोपी सापडत नसताना मुंडे यांच्या कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील माधवबाग येथील शिकवणीवरून घरी परतणाऱ्या मुंडे यांच्या आठवीतील मुलास सोमेश्वरनगर परिसरात गुरुवारी अज्ञात युवकाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणव महादेव मुंडे असे मारहाण झालेल्या मुलाचे नाव आहे.

परळी शहरातील महादेव मुंडे खून प्रकरण एकीकडे राज्यभर गाजत असताना दुसरीकडे मुंडे यांची प्रणव व प्रवीण ही दोन मुले १९ फेब्रुवारी रोजी शहरातील माधवबाग येथे शिकवणीला गेली होती. शिकवणीनंतर ती घरी परतत असताना अज्ञात युवकाने शिवीगाळ करून प्रणव याच्या पाठीवर हातातील कडे फेकून मारल्याची घटना घडली. मारहाण करणारा युवक बालाजी आघाव असल्याचा संशय प्रणव याने व्यक्त केला आहे. मारहाणीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी प्रणव मुंडे यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वरी मुंडेंनी संरक्षणासाठी २० फेब्रुवारीला दिले पत्रमहादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पतीच्या हत्येचा तपास सुरू असतानाच आता कुटुंबीयांना दमदाटी केली जात असल्याचे सांगत २० फेब्रुवारी २०२६ रोजी पोलिसांना पत्र देऊन कुटुंबाला तातडीने पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

खासदार सुळे यांच्याकडून पोलिस संरक्षणाची मागणीराष्ट्रवादी (शरद पवार)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्याचे गृहमंत्री आणि बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांना मुंडे कुटुंबीयांना त्वरित आणि पुरेसे संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Parli Shaken: Murdered Trader's Son Attacked, Wife Seeks Protection

Web Summary : 28 months after trader Mahadev Munde's murder, his son was attacked. His wife seeks police protection due to alleged intimidation. MP Supriya Sule also requested protection for the Munde family.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याCrime Newsगुन्हेगारी