कडा (जि. बीड): बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शेरी पुलावर दोन अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील १६ ग्रॅम सोन्याचे मिनी गंठण भरदिवसा ओरबडून नेले. या झटापटीत महिला स्कुटीवरून पडल्याने नातीसह जखमी झाली आहे. या घटनेमुळे आष्टी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नेमकी घटना काय?आष्टी तालुक्यातील केरूळ येथील एक महिला आपल्या नातीला कडा येथील दवाखान्यात दाखवण्यासाठी स्कुटीवरून आली होती. उपचार घेऊन त्या गावाकडे परतत असताना, शेरी पुलावर मागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीवरील दोन अज्ञातांनी महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण ओरबडले. चोरट्यांच्या या ओढाताढीत महिलेचे स्कुटीवरील नियंत्रण सुटले आणि त्या नातीसह खाली पडल्या. यात त्यांना दुखापत झाली आहे.
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचोरट्यांनी दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केल्यानंतर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गेल्या आठवडाभरात अंभोरा आणि आष्टी परिसरात अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. भरदिवसा घडणाऱ्या या लूटमारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस हवालदार भाऊसाहेब आहेर या प्रकरणाचा तपास करत आहेत, मात्र वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे "पोलीस या चोरट्यांचा शोध घेणार का?" असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
Web Summary : Two unidentified thieves snatched a gold necklace from a woman on the Beed-Nagar highway, injuring her and her granddaughter. The incident raises concerns about police effectiveness as similar thefts have increased in the area, creating fear among residents.
Web Summary : बीड-नगर राजमार्ग पर दो अज्ञात चोरों ने एक महिला से सोने का हार छीन लिया, जिससे वह और उसकी पोती घायल हो गईं। घटना पुलिस की प्रभावशीलता पर चिंता जताती है क्योंकि क्षेत्र में इसी तरह की चोरियां बढ़ी हैं, जिससे निवासियों में डर है।