शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Beed:'सिनेस्टाईल' लूट! धावत्या ट्रॅव्हल्सवर दुचाकीवरील चोरटे चढले, बॅगांची चोरी; प्रवासी भयभीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 15:55 IST

बीड ते तुळजापूर पट्ट्यात प्रवासी भयभीत; व्हायरल व्हिडिओने पोलिसांचे अपयश उघड

बीड : बीड ते तुळजापूरदरम्यान धावणाऱ्या ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना लुटण्याच्या घटना राष्ट्रीय महामार्ग ५२ वर वाढल्या असून, गुन्हेगारांनी अक्षरशः ‘सिनेस्टाईल’ पद्धत वापरून पोलिस प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे. बीड आणि धाराशिव जिल्ह्यांच्या हद्दीत पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नसल्याचे या प्रकारावरून स्पष्ट झाले आहे.

लुटमारीमध्ये चोरटे एका दुचाकीवरून ट्रॅव्हल्सच्या पाठीमागे येतात. त्यातील एक चोरटा धावत्या गाडीवरून ट्रॅव्हल्सच्या कॅरिअरवर चढतो आणि प्रवाशांच्या बॅगा खाली फेकून देतो. दुसऱ्या दुचाकीवरील साथीदार त्या बॅगा जमा करतात आणि चढ किंवा गतिरोधक आल्यावर वेग कमी होताच पसार होतात. या धाडसी पद्धतीचा कथित सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला असूनही, महामार्गावर त्वरित उपाययोजना करण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. या गंभीर घटनांमुळे प्रवासी चांगलेच भयभीत झाले आहेत. पोलिस आणि प्रशासनाच्या डोळ्यादेखत अशा टोकाच्या घटना घडत असल्याने, महामार्गावरील गस्त पूर्णपणे कुचकामी ठरल्याचे दिसत आहे. पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई न केल्यास प्रवाशांवरील हल्ले थांबणार नाहीत, अशी भीती व्यक्त होत आहे.

महामार्गावर भाविकांची लूटबीड जिल्ह्यात गुन्हेगारांनी पोलिसांना आव्हान देत दोन मोठ्या घटना घडवल्या. २४ नोव्हेंबर रोजी बळीराजा हॉटेलसमोर लग्नाहून परतणाऱ्या सोलापूरचे रहिवासी राजू राठी यांच्या गाडीतील १७ पैकी १० बॅगा चोरी झाल्या. या चोरीचा तपास अद्याप लागलेला नाही. दुसरीकडे, बुधवारी मध्यरात्री गेवराईजवळ राष्ट्रीय महामार्ग ५२ वर साईबाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या तेलंगणा येथील भाविकांच्या कुटुंबाला लोखंडी रॉडचा धाक दाखवून लुटण्यात आले. चोरट्यांनी ३ लाख ४६ हजार रुपयांचे दागिने चोरले. या दोन्ही घटनांवरून बीडमध्ये गुन्हेगारांना पोलिसांचा कसलाही धाक उरलेला नसल्याचे स्पष्ट होते. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. परंतू प्रवाशांनी तक्रार देण्यास टाळाटाळ केल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांनी जाहीर केलेली धोकादायक ठिकाणेबीड व धाराशिव पोलिसांनी १० धोकादायक ठिकाणांची यादी व्हायरल केली आहे. यात मांजरसुंबा घाट (बीड), चौसाळा बायपास, पारगाव बायपास, सरमकुंडी फाटा, इंदापूर फाटा, पार्डी फाटा, घुले माळ जवळील उड्डाणपूल, तेरखेडा ते येडशी टोल नाका, येडशी बायपास आणि धाराशिव ते तुळजापूर या प्रमुख भागांचा समावेश आहे.

गुन्हा दाखलबॅग चोरीचा गुन्हा दाखल झालेला आहे; परंतु त्यातील आरोपी अद्याप सापडलेले नाहीत.- अशोक मुदिराज, पोलिस निरीक्षक, बीड ग्रामीण ठाणे

English
हिंदी सारांश
Web Title : Beed: Thieves loot travelers in 'cinematic' style on highway.

Web Summary : Daring thieves are looting Beed travelers using 'cinematic' methods on highway 52. They climb onto moving buses to steal bags. Despite CCTV footage, police haven't stopped the thefts. Passengers are terrified, questioning ineffective highway patrols after multiple incidents, including a 3.46 lakh rupee robbery.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याhighwayमहामार्ग