केज (बीड): शाळेतून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार प्राप्त होताच केज पोलिसांनी अवघ्या दोन तासांत तपास लावत पीडित मुलीला सुरक्षित ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, ज्या तरुणावर पळवून नेल्याचा आरोप होता, तो पीडितेचा सावत्र भाऊ असल्याचे निष्पन्न झाले आहे.
नेमकी घटना काय?केज येथील एका भागात राहणारी १० वीच्या वर्गातील मुलगी शाळेत गेलेली असताना तिथून गायब झाली होती. तिच्या आईने याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सोमवारी रात्री ११ वाजता गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी तपासाची चक्रे फिरवली.
परळी रेल्वे स्टेशनवर सापडलेपोलीस पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला असता, संशयित आरोपी आणि पीडित मुलगी परळी रेल्वे स्टेशनवर असल्याची माहिती मिळाली. परळीतील संभाजीनगर पोलिसांच्या मदतीने केज पोलिसांनी मध्यरात्री १ वाजता दोघांनाही ताब्यात घेतले.
परीक्षेचा राग ठरला कारणपोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. १० वीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसण्यावरून घरात काहीसा वाद झाला होता. त्याच रागाच्या भरात ही मुलगी तिच्या सावत्र भावासोबत लातूरला जाण्यासाठी निघाली होती. दोघेही नात्याने बहीण-भाऊ निघाल्याने आणि मुलीने स्वतःहून गेल्याचे कबूल केल्याने पोलिसांनी दोघांनाही समज दिली. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय लक्ष्मण कीर्तने, पीएसआय अमिरोद्दीन इनामदार आणि जमादार शिवाजी कागदे यांच्या पथकाने केली.
Web Summary : A minor girl ran away with her stepbrother after a dispute over exams. Police swiftly located them at Parli railway station, preventing a potential crisis. The girl admitted to leaving willingly due to anger from a family argument. They were counselled and returned to their relatives.
Web Summary : परीक्षा को लेकर विवाद के बाद एक नाबालिग लड़की अपने सौतेले भाई के साथ भाग गई। पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए उन्हें परली रेलवे स्टेशन पर ढूंढ निकाला और संभावित संकट को टाल दिया। लड़की ने पारिवारिक झगड़े के गुस्से में स्वेच्छा से जाने की बात स्वीकार की। उन्हें समझाया गया और रिश्तेदारों को सौंप दिया गया।