बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभी कार पेटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:21 IST2017-12-16T00:21:03+5:302017-12-16T00:21:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शुक्रवारी दुपारी उभ्या कारने अचानक पेट घेतला. त्यामुळे खळबळ उडाली. ...

बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभी कार पेटली
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शुक्रवारी दुपारी उभ्या कारने अचानक पेट घेतला. त्यामुळे खळबळ उडाली. गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आग विझवली.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पार्किंगमध्ये ही कार उभी होती. आगीचे कारण समजू शकले नाही. या कारच्या बाजूला वाहने नसल्याने हानी झाली नाही. नागरिक व कर्मचा-यांच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले.