बीड-चिंचपूर रस्ता चिखलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:22 IST2021-07-09T04:22:24+5:302021-07-09T04:22:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : तालुका बावीस वर्षांचा झाला. मात्र, एकही काम धड होताना दिसत नाही. बीड-चिंचपूर रस्ता ...

बीड-चिंचपूर रस्ता चिखलमय
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर कासार : तालुका बावीस वर्षांचा झाला. मात्र, एकही काम धड होताना दिसत नाही. बीड-चिंचपूर रस्ता रूंदीकरणासह डांबरीकरणाला मुहूर्त लागला; परंतु हे काम धीम्म्यागतीने सुरू आहे. या कामासाठी रस्त्यावर जागोजागी खड्डे खोदले आहेत. सध्या पावसाचे वातावरण असल्याने रस्ता चिखलमय झाला आहे. त्याचा वाहनचालकांना त्रास होत आहे,
राजुरी-शिरूर-चिंचपूर राज्य मार्ग क्रमांक-५९ हा रस्ता तालुक्याचा मुख्य रस्ता आहे. हा रस्ता नगरला जोडणारा आहे. हा रस्ता सर्वसमावेशक जनहिताचा आहे. सर्व पक्ष, संघटनासोबत येत असतील तर सर्वपक्षीय जनआंदोलन केले जाणार आहे तरी या रस्त्याच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते माधव बडे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे. यावेळी महारूद्र डोंगरे, आदिनाथ नागरगोजे, डी. एम. खाडे, सद्दामभाई, कुंदन बडे उपस्थित होते.
080721\1759-img-20210708-wa0008.jpg
रस्त्याची दुर्दशा