शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

Beed: मोठी बातमी! गेवराई राडाप्रकरणी भाजप नेते बाळराजे पवारांसह ५ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 18:03 IST

नगर परिषद निवडणुकीतील राडाप्रकरणी गुन्हा दाखल; माजी आमदार अमरसिंह पंडितांच्या पीएला मारहाण प्रकरण

बीड (गेवराई): गेवराई नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी (दि. २ डिसेंबर) भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) समर्थकांमध्ये झालेल्या राजकीय राड्याप्रकरणी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या राड्यात थेट माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या कृष्णाई निवासस्थानात घुसून त्यांच्या स्वीय सहायक अमृत डावकर यांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली भाजप नेते बाळराजे पवार यांच्यासह पाच जणांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे.

राजकीय राड्याचे हिंसक स्वरूपगेवराई नगर परिषद निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक ११ मधील एका मतदान केंद्राजवळ किरकोळ वादातून दोन्ही गटांत मारामारी सुरू झाली होती, ज्यामुळे शहरातील वातावरण चांगलेच तापले होते. या वादाला हिंसक वळण लागले. भाजप नेते बाळराजे पवार आणि त्यांच्या साथीदारांनी थेट अमरसिंह पंडित यांच्या 'कृष्णाई' निवासस्थानी घुसून त्यांचे स्वीय सहायक अमृत डावकर यांना मारहाण केली.

पंडित गटाचा प्रतिहल्लायानंतर संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या जयसिंग पंडित आणि पृथ्वीराज पंडित यांच्यासह इतरांनी माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर जाऊन गाडीची तोडफोड केली, ज्यामुळे दोन्ही गट पुन्हा एकदा आमने-सामने आले होते. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी स्वतःहून घेतली. पोलीस रामराम आघाव यांच्या फिर्यादीवरून दोन्ही गटातील ४० ते ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

बाळराजे पवारांसह ५ जणांना अटक'कृष्णाई निवासस्थानात घुसून मारहाण' या गंभीर आरोपाखाली पोलिसांनी सोमवारी रात्री १०:०० वाजण्याच्या सुमारास कारवाई केली. तपासादरम्यान पोलिसांनी बाळराजे पवार यांच्यासह अरुण पवार, महेश खंडागळे, अमर मिसाळ आणि नोमान फारुकी यांच्याविरोधात कलम ३३३ (सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी दुखापत करणे) आणि ११८ (१) (सार्वजनिक शांतता भंग करणे) ही गंभीर कलमे वाढवली. या कलमांखाली गेवराईतून या पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांना मंगळवारी सकाळी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed: BJP leader Balraje Pawar, 5 arrested in Gevrai clash.

Web Summary : Following Gevrai Nagar Parishad election violence, BJP's Balraje Pawar and four others were arrested for assaulting a former MLA's aide. Clashes erupted between BJP and NCP supporters, leading to property damage and police intervention.
टॅग्स :BeedबीडBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस