शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Beed: पाठीवर दप्तर अन् चेहऱ्यावर हास्य; अत्याचार पीडिता पुन्हा शाळेत

By सोमनाथ खताळ | Updated: December 25, 2025 18:54 IST

विधी सेवा प्राधिकरणाचा आधार; आई-वडिलांच्या मनातील भीती दूर

बीड : नाशिकमधील मालेगाव आणि बीड तालुक्यातील शिरूरच्या घटना ताज्या असतानाच, बीडमध्येही सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीवर अत्याचार झाला होता. या प्रकरणाने मुलगी असुरक्षित असल्याची भावना मनात ठेवून पालकांनी तिचे शिक्षणच बंद केले होते. हा प्रकार ‘लोकमत’ने निदर्शनास आणून देताच विधी सेवा प्राधिकरण आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत पालकांचे समुपदेशन केले. पालकांच्या मनातील भीती दूर होताच पीडितेचा मंगळवारी शाळेत पुन्हा प्रवेश निश्चित करण्यात आला. ती पाठीवर दप्तर घेऊन शाळेत जाताच तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

५ नोव्हेंबर रोजी पीडिता बेपत्ता झाली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता; परंतु नंतर पीडितेने यातील सत्य परिस्थिती सांगितल्यावर सूरजकुमार धोंडीराम खांडे (वय २२, रा. म्हाळसजवळा, ता. बीड) याच्याविरोधात पोक्सो आणि ॲट्रॉसिटीची कलमे वाढवण्यात आली. पोलिसांनी तातडीने खांडेला बेड्या ठोकल्या होत्या. परंतु मुलीच्या काळजीपोटी आणि ती असुरक्षित असल्याची भावना मनात निर्माण झाल्याने पालकांनी तिचे शिक्षण बंद केले होते. विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. वहाब सय्यद, तत्त्वशील कांबळे, बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी याबाबत पालकांचे समुपदेशन करून त्यांना आधार दिला. त्यांचे मनपरिवर्तन झाल्याने पीडिता आता पुन्हा शाळेत जाऊ लागली आहे.

खटला लढवण्यासाठी मोफत वकीलअत्याचार पीडित मुलीचे शिक्षण बंद झाल्याचे समजताच ‘लोकमत’ने या विषयावर प्रकाश टाकत १२ डिसेंबर रोजी वृत्त प्रकाशित केले होते. याची विधी सेवा प्राधिकरण, बालहक्क कार्यकर्ते आणि बालकल्याण समिती यांनी गंभीर दखल घेतली. पालकांना बोलावून त्यांचे समुपदेशन करत त्यांना आधार दिला. त्यांना कायदेशीर बाबींची सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानंतर पालकांचे मन स्थिर झाले. आता प्राधिकरणाकडून पीडितेचा खटला लढवण्यासाठी एक मोफत वकीलही देण्यात आला आहे. तसेच ‘मनोधैर्य’सह इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

समुपदेशन करून आधारपालक घाबरलेले असल्याने त्यांनी मुलीचे शिक्षण बंद केले होते. आम्ही त्यांचे समुपदेशन करून त्यांना आधार दिला. आता पुन्हा तिचा त्याच शाळेत प्रवेश घेतला आहे. शाळेत पोहोचताच मुलगी खूप आनंदी झाली.- तत्त्वशील कांबळे, बालहक्क कार्यकर्ते, बीड

English
हिंदी सारांश
Web Title : Beed: Abuse Survivor Returns to School with a Smile

Web Summary : A minor abuse survivor in Beed, whose education was halted due to safety concerns, has returned to school following counseling. Authorities provided support, ensuring legal aid and access to government schemes. Lokmat highlighted the case, prompting swift action and restoring the girl's education and happiness.
टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या