शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीवरील प्रेमाचा राग; काेयत्याने वार करून तरुणाची हत्या; अंबाजोगाईत भरदिवसा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 20:01 IST

याप्रकरणी तिघांविरोधात अंबाजोगाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अंबाजोगाई : बहिणीवर प्रेम करणाऱ्या युवकाला धडा शिकविण्यासाठी त्याच्यावर काठी व कोयत्याने वार करून त्याची हत्या करण्यात आली. मंगळवारी सकाळी शहरातील पोखरी रोडवर हा थरार घडला. जखमी तरुणाला तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल केले; परंतु अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिघांविरोधात अंबाजोगाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

राजकुमार साहेबराव करडे (वय २५, रा. गवळीपुरा, अंबाजोगाई) असे मृत तरुणाचे नाव आहे. राजकुमार हा सकाळी पोखरी रोड परिसरात एका हॉटेलसमोर उभा होता. यावेळी बहिणीवर प्रेम करणाऱ्या राजकुमार याला धडा शिकविण्यासाठी मुलीचा भाऊ वेदांत वैजनाथ शिंदे व आदिनाथ भांडे (रा. सारडानगरी) यांनी राजकुमारला हॉटेलवर गाठले. कोयत्यासह धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या गळ्यावर, डोक्यात, पाठीवर सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात राजकुमार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही अतिरक्तस्त्रावामुळे राजकुमारचा दुपारी मृत्यू झाला. याप्रकरणी केशाबाई साहेबराव करडे (रा. येल्डा रोड, गवळीपुरा, अंबाजोगाई) यांच्या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलीचे वडील वैजनाथ शिंदे, भाऊ वेदांत शिंदे, आदिनाथ भांडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक अनिल चोरमले करीत आहेत.

शॉर्ट फिल्म बनविताना प्रेमराजकुमार हा शॉर्ट फिल्म बनविण्याचे काम करत होता. त्याची व अल्पवयीन मुलीची तेथेच ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मुलीच्या वडिलांना हे प्रकरण मान्य नव्हते. त्यांनी राजकुमारला मुलीपासून दूर राहा अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकीही दिली होती. परंतु तरीही राजकुमारमध्ये सुधारणा झाली नाही. याचाच राग मनात धरून राजकुमारची भरदिवसा हत्या करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीड