बीड-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:24 IST2021-07-18T04:24:41+5:302021-07-18T04:24:41+5:30
राष्ट्रीय महामार्ग क्र.५६१ या अहमदनगर ते बीड या एकूण १४०.७७५ कि.मी. लांबी असलेल्या एकूण १०५० कोटी रुपयांच्या रस्ते कामास ...

बीड-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करणार
राष्ट्रीय महामार्ग क्र.५६१ या अहमदनगर ते बीड या एकूण १४०.७७५ कि.मी. लांबी असलेल्या एकूण १०५० कोटी रुपयांच्या रस्ते कामास मंजुरी मिळणार असून, कामास लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती आ. सुरेश धस यांनी दिली.
नागपूर येथे जाऊन रस्ते विकास आणि वाहतूक विभागाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आ.सुरेश धस यांनी शिष्टमंडळासह भेट घेतली. बीड ते अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी दर्जाच्या कामास मंजुरी मिळावी, तसेच या संपूर्ण रस्त्यावरील अपघातस्थळ असलेल्या जागी रुंदीकरण तसेच प्रमुख गावाजवळ सर्व्हिस रोड करणेबाबत ही सकारात्मक चर्चा करण्यात आली. लवकरच कामास मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.
गडकरी व आ.धस यांच्यात याबाबत जवळपास अर्धा तास सविस्तर चर्चा झाली. यावेळी जि.प. माजी अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला, जि.प. प्रकाश कवठेकर, माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, पाटोदा नगराध्यक्ष बळीराम पोटे, माजी सभापती अंकुश चव्हाण, सरपंच अनिल ढोबळे, संदीप खकाळ, नगरसेवक संतोष मुरकुटे, नगरसेवक असिफ सौदागर, सरपंच दीपक तांबे, सरपंच अशोक सुपेकर, सरपंच सुधीर पठाडे, सरपंच अनिल काथखडे, सरपंच राम धुमाळ, उपसरपंच सागर धोंडे, सरपंच किरण शिंदे, अभय पवार, ज्ञानेश्वर मुरकुटे, सरपंच शरद देसाई, सरपंच अजय गुंड, सरपंच आजीनाथ विधाते आदी उपस्थित होते.
170721\img-20210717-wa0498_14.jpg