शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Beed: अपघात की घातपात? सासरच्यांशी वादानंतर केजकडे निघालेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 17:17 IST

अपघाताच्या आधी सासरच्यांशी भांडण; आंतरजातीय विवाह केलेल्या तरुणाच्या मृत्यूवरून संशय

- मधुकर सिरसटकेज ( बीड) : चिंचोलीमाळी (ता. केज) येथील ३० वर्षीय युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. २५) सायंकाळी घडली. संपत शिवाजी राऊत असे मृत युवकाचे नाव आहे. मात्र, या अपघाताला केवळ चुकून घडलेली दुर्घटना मानावे की पूर्वनियोजित घातपात, याबाबत मृताच्या कुटुंबियांनी गंभीर शंका उपस्थित केली आहे. 

मृत युवकाचे नाव संपत शिवाजी राऊत (३०, रा. चिंचोलीमाळी) असे आहे. बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास तो आपल्या दुचाकीवरून केजकडे जात असताना टाकळी शिवारातील एका वळणावर त्याची दुचाकी रस्त्यालगत असलेल्या झाडाला धडकली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह केज उपजिल्हा रुग्णालयात हलवला.

परंतु या मृत्यूमागील पार्श्वभूमी लक्षात घेतली असता, ही केवळ अपघाताची घटना नसून घातपात असावा, असा संशय मृताच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. संपत राऊत याने दोन वर्षांपूर्वी गावातीलच दुसऱ्या समाजातील मुलीसोबत आंतरजातीय विवाह केला होता. या विवाहामुळे त्याचे सासरच्यांशी संबंध तणावपूर्ण होते. बुधवारी दुपारी सासरच्या मंडळींशी त्याचे भांडण झाले होते. त्यानंतर ते केज पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी निघाले, ही माहिती मिळताच संपत दुचाकीवरून केजकडे निघाला होता. परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

घातपात की अपघात?या मृत्यूमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मृत युवकाचे वडील शिवाजी राऊत व भाऊ विशाल राऊत यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा ठाम आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील पंचनामा व तपास प्रक्रिया काही काळासाठी रखडली. मृतदेहाची उत्तरीय तपासणी गुरुवारी दुपारी अडीच वाजता करण्यात आली, त्यानंतर पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले, अशी माहिती पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी दिली.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याAccidentअपघात