शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

कारमध्येच प्रसूती, रक्त पाहून चालकाला चक्कर आल्याने गाडी उलटली; सुदैवाने सर्वजण सुरक्षित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 14:00 IST

बीड शहरातील कॅनाल रोडवर राहणाऱ्या एका महिलेला पहाटे अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यामुळे कुटुंबियांनी तिला खासगी रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिची कारमध्ये प्रसूती झाली.

बीड : शहरात सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर एक विचित्र अपघात घडला. एका महिलेची कारमध्येच प्रसूती झाल्याने तिला रक्तस्त्राव होत होता. हे पाहून चालकाला अचानक चक्कर आली आणि त्यामुळे त्यांची कार बाजूलाच असलेल्या नाल्यात जाऊन पलटली. सुदैवाने, या अपघातात बाळासह मातेला आणि कारमधील इतर प्रवाशांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.

बीड शहरातील कॅनाल रोडवर राहणाऱ्या एका महिलेला पहाटे अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यामुळे कुटुंबियांनी तिला खासगी रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिची कारमध्ये प्रसूती झाली. खासगी रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार, बाळ, माता आणि इतर दोन महिलांसह चालक असे पाच जण जिल्हा रुग्णालयाकडे येत होते. पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर येताच कारमधील रक्त पाहून चालकाला अचानक चक्कर आली. त्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या बाजूला काम सुरू असलेल्या नाल्यात जाऊन उलटली. 

नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळलाअपघात होताच आजूबाजूच्या काही लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी कारचा दरवाजा तोडून बाळासह मातेला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर इतर दोन महिलांना आणि चालकालाही बाहेर काढण्यात आले. सुदैवाने, या अपघातात चारही लोकांना कोणतीही गंभीर जखम झाली नाही. सध्या बाळ आणि मातेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.

English
हिंदी सारांश
Web Title : Childbirth in Car Leads to Accident; All Safe in Beed

Web Summary : A woman delivered a baby in a car in Beed. The driver fainted from blood loss, causing an accident. Fortunately, mother, baby, and others are safe. Prompt citizen action averted a major tragedy. They are now receiving treatment.
टॅग्स :BeedबीडBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याAccidentअपघात