शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विडा गावात जावयाची 'गदर्भस्वारी'! ३ तरुणांनी दिली हुलकावणी, ७० वर्षांचे आजोबा ठरले धूलिवंदनाचे मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 19:45 IST

सोन्याचे भाव नडले! विड्यात जावयाला यंदा अंगठी मिळाली नाही; ९० वर्षांच्या परंपरेत ७० वर्षांच्या जावयाचा मान

- विनोद ढोबळेविडा : धूलिवंदनाच्या दिवशी गाढवावरून काढल्या जाणाऱ्या मिरवणुकीसाठी केज तालुक्यातील विडा गावात समितीला तब्बल तीन जावयांनी यंदा हुलकावणी दिली. शेवटी गावातीलच ७० वर्षांचे जावई शिवाजी गालफाडे यांना ताब्यात घेऊन त्यांची गाढवावरून पाच तास सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर गावातील हनुमान मंदिराच्या पारावर त्यांना कपड्यांचा पूर्ण आहेर भेट देण्यात आला. यंदा सोन्याचे भाव दीड लाखाच्या पुढे गेल्याने मिरवलेल्या जावयाला अंगठी मात्र मिळाली नाही.

विडा गावात ९० वर्षांपासून धूलिवंदनाच्या दिवशी जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. गावातील दगडू पवार यांचा जावई दुपारच्या जेवणासाठी घरी जात असताना भीतीने एका शेतात लपून बसला. याची माहिती गावच्या समितीला कळल्यानंतर समितीने त्याचा ३० किलोमीटर पेक्षा जास्त पाठलाग केला; परंतु तो हाती लागला नाही. तालुक्यातील शिंदी, येवता, घाटेवाडी या गावांतही समितीला जावई सापडले नाहीत. एक अज्ञात व्यक्तीने समितीला गावातील शेतात एक जावई लपून बसला असल्याचे सांगितले. समितीचे लोक आपल्याकडे येत असल्याचे पाहून घाटेवाडी येथील जावयाने दुचाकी सुरू करत तो पसार झाला. त्याला पकडताना विडा गावचे सरपंच सूरज पटाईत हे जखमी झाले.

७० वर्षांचे जावई शेवटी गावातच सापडलेजावयाचा शोध घेताना समितीची नजर गावातील बाबूराव दुनघव यांचे जावई असलेले शिवाजी गालफाडे यांच्यावर पडली. ते घरीच होते. विड्यात मागील ५० वर्षांपासून ते राहत असून त्यांचे वय ७० च्या घरात आहे. वयामुळे ते जागेवरून पळू शकले नाहीत. त्यांना पकडून ग्रामपंचायत कार्यालयात काही वेळ ठेवण्यात आले. धूलिवंदनाच्या दिवशी सकाळी दहा वाजता गाढवाच्या गळ्यात चप्पल-बुटाची माळ घालण्यात आली. मानकरी जावई शिवाजी दादाराव गालफाडे यांना गाढवावर बसवून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सरपंच सूरज पटाईत, उपसरपंच सदाशिव वाघमारे, गोविंदा देशमुख, राजेभाऊ घोरपडे, महादेव पटाईत, रोहिदास ढोबळे, शिवाजी वाघमारे, दादा पटाईत, राजकुमार पटाईत सहभागी झाले होते.

वयाच्या सत्तरीत मी मानकरी ठरलोमाझं वय झाल्यामुळे मी पळू शकलो नाही. कोणीतरी जावई धरला असेल म्हणून मी गाफील राहिलो होतो. मला वाटलं कमिटीला माझा विसर पडला असेल; पण वयाच्या सत्तराव्या वर्षी मी मानकरी ठरलो.- शिवाजी गालफाडे, धूलिवंदनाचे मानकरी जावई

English
हिंदी सारांश
Web Title : Groom's donkey ride in Vida; elderly man becomes honored guest.

Web Summary : In Vida, three grooms evaded the traditional donkey ride during Dhulivandan. Ultimately, 70-year-old Shivaji Galphade was chosen. He was paraded through the village for five hours, then gifted clothes at the Hanuman temple.
टॅग्स :BeedबीडHoliहोळी 2026