कोरोना रुग्णांसाठी बेड्स उपलब्ध; पण पैसे मोजूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:36 IST2021-03-23T04:36:07+5:302021-03-23T04:36:07+5:30
बीड : बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. औषधोपचारासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. उपाययोजना सुरू आहेत. ...

कोरोना रुग्णांसाठी बेड्स उपलब्ध; पण पैसे मोजूनच
बीड : बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. औषधोपचारासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. उपाययोजना सुरू आहेत. बीड जिल्ह्यात सध्या एकूण २४८७ बेड्स आहेत. त्यापैकी ४०४ बेड्स खासगी कोरोना रुग्णालयांत उपलब्ध असले तरी त्यासाठी दररोज चार हजार ते नऊ हजारांपर्यंत एका बेडसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. आजची परिस्थिती बघितली तर २४८७ बेड्सपैकी १५६९ बेड्स हे रिकामे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ऑक्सिजनचे शासकीय रुग्णालयात १५४३, खासगी रुग्णालयात ३०७ बेड्स आहेत. यापैकी १०८० बेड्स रिकामे आहेत. आयसीयूचे शासकीय २७० तर खासगीत ७८ बेड्स आहेत. यापैकी २०० रिकामे आहेत. व्हेंटिलेटरची संख्या शासकीय २७० तर खासगी रुग्णालयात १९ आहेत. यापैकी २८९ बेड्स रिकामे आहेत.
खासगी रुग्णालयात ऑक्सिजन बेडसाठी प्रतिदिन ४००० रुपये, आयसीयू बेडसाठी साडेचार हजार रुपये तर व्हेंटिलेटर बेडसाठी प्रतिदिन नऊ हजार रुपये शासकीय दर आहेत. शिवाय इतर आरोग्य सेवेचे दर वेगळेच असतील. हे सर्व टाळण्यासाठी मास्क वापरावा, सुरक्षित अंतर ठेवावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. हे केले तर आपली कोरोनापासून मुक्तता होऊ शकते.
बीड जिल्ह्यातील एकूण बेड्सची आकडेवारी
ऑक्सिजन बेड
शासकीय १५४३
खासगी ३०७
रिकामे १०८०
आयसीयू बेड
शासकीय २७०
खासगी ७८
रिकामे २००
व्हेंटिलेटर बेड
शासकीय २७०
खासगी १९
रिकामे २८९
शासनमान्य खासगीत बेड्सचे दर
ऑक्सिजन बेड ४०००
आयसीयू बेड ४५००
व्हेंटिलेटर बेड ९०००
एकूण बेड्स २४८७ रिकामे बेड्स १५६९
शासकीय एकूण २०८३ रिकामे १४५९
खासगी एकूण ४०४ रिकामे ११४