मनाप्रमाणे वाटणी देत नसल्याने भावाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:23 IST2021-06-17T04:23:49+5:302021-06-17T04:23:49+5:30
बीड : माझ्या आवडीनुसार शेती व घर वाटून का देत नाहीस, अशी विचारणा करीत भावाने भावाला मारहाण करून जिवे ...

मनाप्रमाणे वाटणी देत नसल्याने भावाला मारहाण
बीड : माझ्या आवडीनुसार शेती व घर वाटून का देत नाहीस, अशी विचारणा करीत भावाने भावाला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.
डॉ. रमेश नारायणराव मस्के हे राजीव गांधी चौकातील जिजाऊनगर भागात राहतात. १४ जून रोजी सुरेश नारायणराव मस्के, कीर्ती सुरेश मस्के, पीयुष सुरेश मस्के यांनी आपल्या घराच्या दरवाज्यावर दगड मारून घरात जबरदस्तीने घुसून वाटणीच्या कारणावरून डोक्यात दगड मारून जखमी केले, तसेच घरातील इतरांना लाथा-बुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार डॉ. रमेश यांनी दिल्यावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------
मालवाहू रिक्षाची बॅटरी चोरली
बीड : शहरातील माऊलीनगर पांगरी रोड भागात मालवाहू रिक्षातील इलेक्ट्रिक बॅटरी लॉक व वायर तोडून चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी सुरेश बावळे यांनी ३८०० रुपयांची बॅटरी चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
---------
सासरा शेत विकत नाही, म्हणून पत्नीवर कोयत्याने हल्ला
बीड : दुसऱ्यांचे देणे झाल्याने कर्ज फेडण्यासाठी तुझे वडील शेत का विकत नाहीत, या कारणावरून पतीने लोखंडी कोयत्याने पत्नीवर हल्ला केला. गेवराई येथील संतोषनगर येथे ही घटना घडली. पती ज्ञानेश्वर वीर याने शिवीगाळ व लाथा-बुक्क्याने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच उजव्या हाताच्या कोपरावर, मनगटावर तसेच डाव्या हाताच्या दंडावर आणि उजव्या पायाच्या गुडघ्यावर कोयत्याने मारून जखमी केले, अशी फिर्याद शारदा ज्ञानेश्वर वीर यांनी दिली असून पती ज्ञानेश्वर मुरलीधर वीर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.