मजुरांची टोळी पळविल्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:38 IST2021-08-13T04:38:04+5:302021-08-13T04:38:04+5:30

... अंगणवाडी सेविकेचा मोबाइल लंपास कडा : तालुक्यातील मराठवाडी येथून अंगणवाडी सेविका उषा पांडुरंग दळवी यांचा १४ हजार ३०० ...

Beaten by a gang of laborers | मजुरांची टोळी पळविल्याने मारहाण

मजुरांची टोळी पळविल्याने मारहाण

...

अंगणवाडी सेविकेचा मोबाइल लंपास

कडा : तालुक्यातील मराठवाडी येथून अंगणवाडी सेविका उषा पांडुरंग दळवी यांचा १४ हजार ३०० रुपयांचा मोबाइल चोरट्यांनी लांबविला. उषा यांनी मोबाइल खिडकीत ठेवला होता. चोरट्यांनी खिडकीची जाळी उचकटून तो लांबविला. ११ ऑगस्ट रोजी अंभोरा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

....

बांधावरून शेतकरी दाम्पत्यास मारहाण

शिरूर : शेताचा बांध आमच्याकडे का सरकावला, अशी कुरापत काढून लक्ष्मण दगडू खेडकर यांना दगडाने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील वारणी येथे ४ ऑगस्ट रोजी घडली. त्यांची पत्नी भांडण सोडविण्यास आली तेव्हा तिलाही चापटाने मारहाण करण्यात आली. शंकर बाबासाहेब केदार, बाबासाहेब दत्तू केदार, किसन दत्तू केदार, कांताबाई शंकर केदार यांच्यावर ११ ऑगस्ट रोजी शिरूर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

...

Web Title: Beaten by a gang of laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.