शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

दुष्काळाने पडला बीडचा अडत बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 00:22 IST

दररोज पाच ते सात हजार क्विंटल धान्याची आवक असणाऱ्या बीड येथील कृषी उत्पन्न बाजार पेठेत यंदा आॅगस्टपासूनच धान्याची आवक कमालीची घटल्याने बाजारपेठेवर अवलंबून असलेले सर्व घटक होरपळून निघत आहेत.

ठळक मुद्देगतवर्षीच्या तुलनेत आठ कोटींच्या उलाढालीला फटका : धान्याची आवकच नाही, व्यापारी, अडते, हमाल, कामगारांच्या ८०० कुटुंबांना फटका

अनिल भंडारी।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दररोज पाच ते सात हजार क्विंटल धान्याची आवक असणाऱ्या बीड येथील कृषी उत्पन्न बाजार पेठेत यंदा आॅगस्टपासूनच धान्याची आवक कमालीची घटल्याने बाजारपेठेवर अवलंबून असलेले सर्व घटक होरपळून निघत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत बाजारात ४० टक्केच मालाची आवक झाली.खरीप हंगामात तूर, सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, बाजरीची पिके बीड व तालुक्यातील शेतकरी घेतात. याशिवाय उसाचे क्षेत्रही आहे. तर रबी हंगामात गहू, ज्वारी आणि हरभरा पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. बीड बाजार समितीमध्ये ७२ आडत दुकाने आहेत. तर नेकनूर, चौसाळा आणि पिंपळनेर येथे उपबाजारपेठा नावालाच आहे.२०१७-१८ मध्ये येथील बाजारात ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, सोयाबीन, उडीद, मूग, तूर, मका इ. मालाची समाधानकारक आवक झाली. सरासरी भाव पाहता १७ कोटी १८ लाख ८९ हजार ८५६ रुपयांची उलाढाल झाली. याशिवाय मूग, सोयाबीन, उडीद, कापूस, तूर, हरभरा आदी मालाची ४ लाख ४५ हजार १९४ क्विंटल शासकीय खरेदी झाली आहे. तर २०१८-१९ मध्ये ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, उडीद, मूग, तूर, मका, सोयाबीन, चिंच आदी मालाची ३५ हजार ६१५ क्विंटल आवक झाली. सरासरी भावानुसार ९ कोटी २३ लाख २५ हजार ४०८ रुपयांची उलाढाल झाली.या दोन वर्षातील तुलना केल्यास २०१८-१९ मध्ये ७ कोटी ९५ लाख ६४ हजार ४४८ रुपयांच्या उलाढालीला फटका बसला आहे. धान्य बाजारात आले नाही. त्यामुळे व्यापार, सौदे झाले नाही. परिणामी बाजार समितीला मिळणाºया उत्पन्नातही ५० टक्के घट झाली आहे.बीड सारख्या बाजारपेठेत ग्रेडिंग मशीन व प्रशिक्षित ग्रेडर नाही. होणारी प्रतवारी देखील विश्वसार्ह आवश्यक आहे. मात्र, सुविधांअभावी आॅनलाईन व्यापारी पद्धत फोल ठरणार आहे.बीडचा मोंढा बाजार : ठळक वैशिष्ट्ये२० वर्षांपूर्वी येथील मोंढ्यात ५ ते ७ हजार क्विंटल धान्याची आवक होत असते. सध्या १०० क्विंटल आवक होत आहे.धने, जवस, करडई, सूर्यफूल, भुईमुगाचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत. नंतर बहुतांश शेतकरी कापसाकडे वळले. उत्पादनच नसल्याने आता हा माल आडतीवर येत नाही.मोठ्या प्रमाणात आवक आणि उलाढालीमुळे बीडच्या मोंढ्यात ३०० हमालांना रोजगार मिळत होता. दिवसेंदिवस आवक घटल्याने उलाढालीवर परिणाम झाला. सध्या २५ हमाल येथे काम करतात.मापाडीदेखील जवळपास ४० होते. फारसे काम नसल्याने ही संख्या रोडवली असून ८ ते १० मापाडीच काम करतात.बीडच्या मोंढ्यात दिवसाकाठी ६०० ते ७०० रुपये रोज मजुरी मिळायची, त्यामुळे एम. ए. बी. कॉम. झालेले तरुणही येथे हमाली कामासाठी येत. मात्र कामच नसल्याने बाजाराकडे फारसे कोणी फिरकत नाही.मोंढ्यात साडेदहा वाजता झेंडा लागायचा, दुपारी २ वाजेपर्यंत लिलाव व्हायचे. मात्र दुष्काळामुळे धान्याची आवक नसल्याने ही प्रक्रिया अर्ध्या तासातच पूर्ण होते.

टॅग्स :BeedबीडMarket Yardमार्केट यार्ड