बीड गोदामातील अपहार ८१ लाखांपेक्षाही वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 01:01 AM2019-07-23T01:01:28+5:302019-07-23T01:02:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : बीडच्या शासकीय धान्य गोदामातील ८१ लाख रुपयांच्या मालाचा अपहार करुन भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले ...

Bead Warehouse wrecks will increase by more than 81 lakhs | बीड गोदामातील अपहार ८१ लाखांपेक्षाही वाढणार

बीड गोदामातील अपहार ८१ लाखांपेक्षाही वाढणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीडच्या शासकीय धान्य गोदामातील ८१ लाख रुपयांच्या मालाचा अपहार करुन भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले होते. याप्रकरणी बीड ग्रामीण ठाण्यात गोदाम व्यवस्थापक दिलीप भडके याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. मात्र, हा अपहार ८१ लाखांचा नसून याचा आकडा वाढल्याची नवीन माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाचा तपास करताना, पोलीसांना व पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना नेमका किती माल होता व किती मालाचा अपहार झाला याबबत संभ्रमाचे वातावरण होते. मात्र १ एप्रिल रोजी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय पथकानेच तब्बल ६९ लाखांचा घोटाळा उघडकीस आणला होता. यावेळी देण्यात आलेल्या अहवालामध्ये रेशनच्या गव्हाचा उल्लेख नव्हता. त्यानंतर मे २०१९ मध्ये तहसीलदारांनी केलेल्या पंचनाम्यात ६३ लाख रुपये किमतीच्या गव्हाचा देखील अपहार केल्याचे समोर आले होते. त्यामुळे अपहाराचा आकडा वाढणार असून हा अपहार १ कोटीपेक्षा जास्त रुपयांचा असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, या प्रकरणाची योग्य चौकशी झाल्याशिवाय नेमका किती अपहार झाला आहे याचे गुढ उकलणार आहे.
यापुर्वी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांकडून लाच स्वीकारताना अपर जिल्हाधिकारी कांबळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले होते. त्यानंतर देखील अपहार केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच त्यांच्याकडून अपहार केलेल्या मालाच्या रखमेची वसूली देखील करण्यात येणार आहे. त्यानंतर २४ मे रोजी तहसीलदारांनी गोदामाच्या पंचनामा केला आणि त्यात इतके धान्य कमी असल्याचे समोर आल्यांनंतर तब्बल दीड महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु गोदामाची पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय पथकाने, जे गोदाम तपासणीतील तज्ञ आहेत त्यांनी १ एप्रिल रोजी तपासणी केली होती. यात गहू वगळता तांदूळ, साखर आणि डाळी असे तब्बल ६९ लाखाचे धान्य कमी आढळून आले होते. त्याची वसुली करण्याची शिफारस पथकाने केली होती, त्यानुसार गोदाम व्यवस्थापकासह तहसीलदार, नायब तहसीलदार यांना देखील नोटिसा देखील बजावण्यात आल्या होत्या.
तहसीलदारांनी बीड धान्य गोदाम ताब्यात घेतला होता व मे महिन्यात गोदाम तपासणी करुन पंचनामा केला होता. यावेळी ८१ लाखांचे धान्य कमी असल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे यात तब्बल ६३ लाखांचा गहू कमी दाखविण्यात आला आहे. परंतु पथकाने केलेल्या तपासणीमध्ये व तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी केलेल्या तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे दिसून येत आहे. कारण एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला गहू वगळता झालेला अपहार ६९ लाखांचा होता, तर मे महिन्यात ६३ लाखांचा गहू गोदामात नसताना देखील आकडा अहवालामध्ये केवळ ८१ लाखाचा आहे. यावरुन हा धान्याचा अपहार ८१ लाखाचा नसून त्याची किंमत १ कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title: Bead Warehouse wrecks will increase by more than 81 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.