शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

आचारसंहितेच्या काळात सतर्क रहा - आस्तिककुमार पाण्डेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:37 PM

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची आचारसंहिता बीड लोकसभा मतदार संघात लागू झाली असून या काळात शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून जबाबदारीचे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी गुरुवारी दिले.

ठळक मुद्देप्रशासनाची तयारी : निवडणूक कामकाजात सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांना एकदिवसीय प्रशिक्षण

बीड : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची आचारसंहिता बीड लोकसभा मतदार संघात लागू झाली असून या काळात शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून जबाबदारीचे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी गुरुवारी दिले. यंशवतराव चव्हाण नाट्यगृहातील सभागृहात निवडणूक यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.यावेळी कार्यशाळेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आचारसंहिता कक्ष प्रमुख अमोल येडगे, उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, यासह मतदार संघातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, क्षेत्रीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना जिल्हाधिकारी पाण्डेय म्हणाले, आचारसंहितेची नि:पक्षपातीपणे आणि पारदर्शकतेने अमलबजावणी होणे गरजेचे आहे. याकालावधीत कार्यवाही करताना मानवी चुका कमी व्हाव्यात याकडे लक्ष दिले जावे. कर्तव्य बजावताना आपल्यावरील जबाबदारीचे सद्दविवेकीपणे पालन केले जावे. निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे आवश्यक असलेले अहवाल, प्रपत्र आदी नियमितपणे आणि काळजीपूर्वक पूर्ण करुन संबंधितांनी दिले पाहिजेत या दृष्टीने जिल्हास्तरावरुन उमेदवारांचा निवडणूक खर्च, आचारसंहिता भंगाच्या तक्रारीबाबतच्या सूचना, सी-व्हीजील अ‍ॅप वरील तक्रारी आपल्या पर्यंत पोहचतील त्यावर तातडीने कारवाई आपेक्षित आहे.ते पुढे म्हणाले, निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रचाराशी संबंधित होंर्डीग्स, पोस्टर्स काढले जाणे गरजेचे होते याअनुषंगाने जिल्ह्यातील नगरपरिषदा, शासकीय प्रसिध्दीच्या एसटी बसेस वरील जाहिराती आढळून आल्यास संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी गुन्हे दाखल करावेत असे निर्देश पाण्डेय यांनी यावेळी दिले.

टॅग्स :Beedबीडcollectorजिल्हाधिकारीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक