Bank Depression in the Kharif Season Crunch Debt Distribution | खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपात बँकांची उदासीनता
खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपात बँकांची उदासीनता

ठळक मुद्देकर्ज माफ होण्याची आशा : माफ झालेल्या खातेदारांना नवीन कर्ज मिळण्यास अडचणी

बीड : शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पेरणीसाठी कर्ज मिळावे यासाठी शासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व बँकाना उद्दिष्ट ठरवून दिले आहे. खरीप हंगामातील पेरणी अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना व शेतकऱ्यांकडून कर्जाची मागणी असताना देखील बँकांकडून मात्र, ५ टक्के देखील कर्जाचे वाटप केलेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जिल्ह्याली एकूण शेतकºयांची संख्या ६ लाख ५१ हजार १७ हजार एवढी आहे. तर खरीप हंगामातील लागवडीखालील क्षेत्र जवळपास ७ लाख २७ हजार ५२३ हेक्टर आहे. यामध्ये मुख्य पीक कापूस, सोयबीन, तूर, उडीद व इतर पीके घेतले जातात. दोन वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असल्यामुळे शेतातील उत्पादनाचा उतारा हा कमी आलेला आहे. खरीप हंगाच्या पेरणीसाठी लागणाºया आर्थिक भांडवलाची चिंता सध्या शेतकºयांपुढे उभा आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गंत ३० जून २०१६ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकºयांचे दिड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी केलेली आहे. कर्ज माफ झालेल्या शेतकºयांना नवीन कर्ज देण्यास बँकेकडून अडवणूक केली जात असल्याची माहिती शेतकºयांनी दिली. तसेच ३० जून २०१६ नंतर कर्ज घेतलेल्या शेतकºयांचे देखील कर्ज माफ होईल असे वाटत असल्यामुळे नवेजुने करुन कर्ज घेण्यास शेतकरी तयार नसल्याचे बँक अधिकारी सांगतात.
खरीप हंगामातील कर्ज वाटप करण्यासाठी १७ बँकांना ९५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिलेले आहे. त्यापैकी ३० तारखेपर्यंत फक्त ४२ कोटी ७७ लाख रुपये कर्ज वाटप केले आहे. म्हणजेच ४.५० टक्के इतकेच कर्जाचे वाटप करण्यात आलेले आहे. बँकेच्या या उदासीनतेमुळे खरीप पेरणी करायची कशी भागभांडवल जमा कसे करायचे हा प्रश्न जिल्ह्यातील शेतकºयांपुढे उभा राहिला आहे. प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून कार्यवाही करण्याची मागणी आहे.
उद्दिष्ट ९५० कोटी : वाटप ४२.७७ कोटी
४जिल्ह्यातील १७ बँकांना ९५० कोटी खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले आहे.
४यामध्ये सर्वाधिक एसबीआय २९० कोटी, एमजीबी २५० कोटी, बीओएम १०० कोटी, बीडीसीसी १०० कोटी व इतर १३ बँकांना २१० कोटी असे ९५० कोटीचे उद्दिष्ट दिले आहे.
४मात्र, ३० तारखेपर्यंत ४ हजार २८५ शेतकºयांना ४२.७७ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत


Web Title: Bank Depression in the Kharif Season Crunch Debt Distribution
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.