शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

बीडमध्ये बंजारा समाजाचा दणका मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:14 AM

बीड : सततच्या छेडछाडीला कंटाळून बंजारा समाजातील इयत्ता नववीतील स्वाती राठोड हिने आपली जीवन यात्रा संपविली. यातील आरोपीला कठोर ...

ठळक मुद्देस्वाती राठोडला न्याय द्या : दखल न घेतल्यास आक्रमक आंदोलनाचा इशारा

बीड : सततच्या छेडछाडीला कंटाळून बंजारा समाजातील इयत्ता नववीतील स्वाती राठोड हिने आपली जीवन यात्रा संपविली. यातील आरोपीला कठोर शासन व्हावे आणि लेकी-बळीच्या संरक्षणमिळावे यासाठी बंजारा या समाजाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट दणका मोर्चा काढण्यात आला. यात ‘उठ तांडो ला दांडो, अन्याय कारेवाळेर फोड मुंडो’ या घोषणेने परिसर दणाणला.ना पक्षासाठी, ना नेत्यांसाठी, रस्त्यावर आलोय लेकींच्या संरक्षणासाठी या मुद्यावर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने बंजारा समाज बांधव दाखल झाला. आपल्या लेकीवर झालेल्या अन्यायामुळे संतापलेल्या समाजाने प्रशासनवर विश्वास ठेवत छत्रपती शिवाजी स्टेडियमपासून शांततेच्या मार्गाने मोर्चाला सुरु वात केली. यावेळी बंजारा बांधवांनी घोषणाबाजी करत अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी पुतळ्याला हार घालून प्रमुख मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. येथे वक्त्यांनी व्यवस्थेबद्दल असलेला समाजाचा रोष भाषणातून व्यक्त केला.जर आपल्यावर अन्याय होत असेल तर आपल्याला आता शांत बसायची वेळ संपली. आतापर्यंत झालेले अन्याय अत्याचार सहन केले पण आज आम्ही आमच्या लेकीसाठी रस्त्यावर आलो आहोत. आज शांततेत मोर्चा केला आहे. परंतु प्रशासन यावरही दाखल घेत नसेल तर आता शांततेत मोर्चा होणार नसल्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनात बंजारा बांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :BeedबीडSuicideआत्महत्याMorchaमोर्चाagitationआंदोलन