इस्कॉनच्या राधागोविंद मंदिरात बलराम पौर्णिमा उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:35 IST2021-08-23T04:35:42+5:302021-08-23T04:35:42+5:30
बीड : शहरातील इस्कॉनच्या श्री श्री राधा गोविंद मंदिरात रविवारी श्री बलराम पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...

इस्कॉनच्या राधागोविंद मंदिरात बलराम पौर्णिमा उत्सव
बीड : शहरातील इस्कॉनच्या श्री श्री राधा गोविंद मंदिरात रविवारी श्री बलराम पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
बलराम पौर्णिमा उत्सवात पहाटे साडेचार वाजल्यापासून मंदिरामध्ये भगवंतांची मंगल आरती, श्रुंगार आरती करण्यात आली. दहा वाजता कृष्ण बलराम यांचा अभिषेक दूध, दही, मध, तूप, फळांचे रस अशा पंचगव्याने करण्यात आला. भगवंतांना ५६ भोग अर्पण करण्यात आले. भगवंतांची महाआरती झाली. सायंकाळी राधाकृष्ण यांना ‘झुलन यात्रा’ करवण्यात आली. विठ्ठलानंद प्रभू ,यादवेंद्र प्रभू, कृष्णनाम दास व आहेर वडगाव येथील भक्तांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
बलराम सर्वशक्तिमान
संतदास प्रभू यांचे श्री बलराम लीलेवर आधारित प्रवचन झाले. श्रीकृष्णांचे थोरले भाऊ म्हणून श्री बलराम हे आद्य गुरू म्हणून ओळखले जातात. भगवान श्रीकृष्णांची पाचही भावांमध्ये सेवा करणारे हे सेवक भगवान आहेत. बल म्हणजे ‘शक्ती’ आणि राम म्हणजे ‘आनंद’ देणारे म्हणजेच बलराम हे सर्वशक्तिमान असून ते सर्व जीवांना आनंद देतात म्हणून त्यांना बलराम असे म्हणतात, असे प्रतिपादन संत दास प्रभू यांनी यावेळी केले.
220821\22_2_bed_3_22082021_14.jpg
बलराम पौर्णिमा