पाळी, कोळपणीच्या कामात बळीराजा व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:21 IST2021-07-03T04:21:40+5:302021-07-03T04:21:40+5:30

... ऑनलाईन शिकवणीत अडचणीत वाढ वडवणी : कोरोनाच्या संकटाने ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुले शिक्षणाच्या प्रवाहातून दूर ...

Baliraja is busy with shift work | पाळी, कोळपणीच्या कामात बळीराजा व्यस्त

पाळी, कोळपणीच्या कामात बळीराजा व्यस्त

...

ऑनलाईन शिकवणीत अडचणीत वाढ

वडवणी : कोरोनाच्या संकटाने ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुले शिक्षणाच्या प्रवाहातून दूर राहू नयेत म्हणून ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. नर्सरीपासून ते उच्चशिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. मात्र, शहरासह तालुक्यात सातत्याने मोबाइलची रेंज गूल होत असल्याने ऑनलाइन शिक्षणात व्यत्यय येत आहे. परिणामी, शिक्षक, पालकातून संताप व्यक्त होत आहे. रेंजसाठी उंचीवरच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जावे लागत आहे. तरी नेटवर्क सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

...

बाजारात निर्बंधांचे उल्लंघन सुरूच

वडवणी : कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, शासनाने निर्बंध पुन्हा कडक केले आहेत. दुपारी ५ वाजण्याच्या नंतर संचारबंदी आहे. परंतु वडवणी शहरातील बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी येणारे अनेक नागरिक विनामास्क फिरत आहेत. शिवाय सुरक्षित अंतराच्या नियमालाही तिलांजली दिली जात आहे. काही दुकानदारही प्रशासकीय सूचनांचे उल्लंघन करीत आहेत. ही बाब पाहता, प्रशासनाने कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Baliraja is busy with shift work