शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत
2
Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'
3
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 
4
भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   
5
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार
6
देसी सुपरस्टार मनोज वाजपेयींच्या 'भैय्याजी'चा अ‍ॅक्शनपॅक ट्रेलर भेटीला
7
अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती
8
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
9
दमदार इंजिन अन् शानदार मायलेज; लॉन्च झाली नवीन मारुती Swift, जाणून घ्या किंमत...
10
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
11
KL Rahul ला झापणाऱ्या संजीव गोएंका यांनी MS Dhoni लाही अचानक कर्णधारपदावरून हटवले होते... 
12
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
13
Go Digit IPO : १५ मे पासून खुला होतोय 'हा' IPO, ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजी; Virat Kohli ची आहे गुंतवणूक
14
अक्षय्य तृतीया: ‘असे’ कसे करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, अद्भूत योग, महत्त्व अन् मान्यता
15
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
16
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
17
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा
18
महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? शरद पवारांचं मोठं भाकित, थेट आकडाच सांगितला 
19
'तुमचा पक्ष चालवा ना, दुसऱ्यामध्ये कशाला तोंड घालता'; शरद पवारांचे मोजक्या शब्दात अजितदादांना प्रत्युत्तर
20
९ वर्षांपासून फरार, FBI ने गुजराती तरुणावर ठेवले २०८००००० रुपयांचे बक्षीस, कोणता गुन्हा केलाय?

एसटीमध्येच प्रसूती, बाळ दगावले, बीडमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 6:12 AM

दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयातून सुटी दिलेल्या महिलेची शुक्रवारी पुन्हा जिल्हा रुग्णालयात येत असताना बसमध्येच प्रसूती झाली.

बीड : दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयातून सुटी दिलेल्या महिलेची शुक्रवारी पुन्हा जिल्हा रुग्णालयात येत असताना बसमध्येच प्रसूती झाली. ही घटना तालुक्यातील जरुड फाट्यावर घडली. दुर्दैवाने यामध्ये बाळ दगावले असून, आईवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.वर्षा देवकते असे महिलेचे नाव आहे. त्या बाळंतपणासाठी सासरवाडी आसरडोह येथून माहेरी हिवरा पहाडी (ता. बीड) येथे आल्या होत्या. दिवस भरल्याने त्यांना दोन दिवसांपूर्वी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. परंतु कळा न आल्याने डॉक्टरांना घरी जायला सांगितले. शुक्रवारी सकाळी प्रसवकळा येण्यास सुरुवात झाल्यानंतर नातेवाईकांनी तात्काळ बसमधून रुग्णालयात आणण्याचा प्रयत्न केला. जरुड फाट्याजवळ बस आली असता कळा वाढल्याने चालकाने बस बाजूला थांबवली. बसमधील इतर महिलांनी पुरुषांना खाली उतरवत तिची प्रसूती बसमध्येच केली. जन्मल्यानंतर बाळ रडले नाही त्यामुळे नातेवाईकांनी आई व बाळाला जिल्हा रुग्णालयात तात्काळ दाखल केले. डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले. 

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीड