शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

'बाबासाहेब आगे मला भावा समान'; आरोपीच्या पत्नीने हत्येचं कारण उघड केलं, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 16:47 IST

Babasaheb Aage Murder Case: दारूच्या व्यसनातून निर्माण झालेला संशय ठरला खूनाला कारण; पतीच्या विकृत मानसिकतेचा बळी ठरले बाबासाहेब आगे

बीड: किटी आडगाव येथील भाजप पदाधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब आगे यांची माजलगाव मध्ये भरदिवस झालेली क्रूर हत्या आता वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे. या हत्येचे खरे कारण आरोपी नारायण फपाळ याच्या पत्नीने सांगितले आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून आरोपीची पत्नी यांनी ही घटना केवळ दारूचे व्यसन असलेल्या पतीच्या संशयीवृत्तीमधून झाली असल्याचे म्हंटले आहे.

आरोपी नारायण फपाळ याच्या पत्नीने सांगितले की, पतीला दारूचे व्यसन होते, त्यातच तो संशयीवृत्तीचा होता. सातत्याने चारित्र्यावर संशय घेत असे. त्याचे शिव्या देऊ मारहाण करणे, गावातील इतर पुरुषांबद्दल शंका घेणे, हे त्याचं रोजचंच झालं होतं. बाबासाहेब आगे मला भावा समान होते. केवळ मदतीच्या हेतूने त्यांनी नेहमी सहकार्य केलं होतं. मात्र, बाबासाहेब यांच्याबद्दलही मनात संशय निर्माण झाला आणि यातूनच  पती नारायण फपाळ याने अमानुषपणे खून केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ही घटना भाजपा तालुका सरचिटणीस बाबासाहेब आगे हे माजलगाव येथे भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांची भेट घेण्यासाठी शाहू नगर येथील कार्यालयात गेले असताना मंगळवारी ( दि. १५ ) दुपारी घडली. आगे कार्यालयाच्या बाहेर पडताच दबा धरून बसलेल्या नारायण फपाळ याने शर्टमध्ये लपवलेला कोयता बाहेर काढत अचानक हल्ला केला. वार चुकवून आगे पुढे पळाले. पण फपाळ याने त्यांना काही अंतरावर गाठून कोयत्याचा वार केला. काही क्षणांत बाबासाहेब आगे रक्तबंबाळ होऊन कोसळले. त्यानंतर फपाळ याने पुन्हा अनेक वार केले. हल्ल्यानंतर नारायण फपाळ थेट माजलगाव पोलीस ठाण्यात गेला आणि खुनाची कबुली दिली.

पंकजा मुंडे यांनी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारलीदरम्यान, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत बाबासाहेब आगे यांना “धडाडीचा कार्यकर्ता” अशी श्रद्धांजली वाहिली. त्यांनी आगे कुटुंबीयांची पुढील जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला असून, आज दुपारी त्या माजलगाव येथे जाऊन आगे कुटुंबीयांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडे