पैशांच्या कारणावरून कुटुंबावर कुऱ्हाडीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:36 IST2021-09-25T04:36:37+5:302021-09-25T04:36:37+5:30

सिरसाळा : उसण्या पैशांवरून एका कुटुंबावर कुऱ्हाडीने हल्ला चढविण्यात आला. यात तिघे जखमी झाले. ही घटना २३ सप्टेंबर ...

Ax attack on family for money reasons | पैशांच्या कारणावरून कुटुंबावर कुऱ्हाडीने हल्ला

पैशांच्या कारणावरून कुटुंबावर कुऱ्हाडीने हल्ला

सिरसाळा : उसण्या पैशांवरून एका कुटुंबावर कुऱ्हाडीने हल्ला चढविण्यात आला. यात तिघे जखमी झाले. ही घटना २३ सप्टेंबर रोजी देवठाणा (ता. धारूर) येथील नागझरी तांडा येथे घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून सिरसाळा ठाण्यात आठ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला.

सुनील अंबादास राठोड (रा. नागझरी तांडा, देवठाणा) यांच्या तक्रारीनुसार, २३ रोजी पहाटे साडेपाच वाजता त्यांचे वडील शौचास चालले होते. यावेळी रस्त्यात अडवून तुमच्या मुलाने घेतलेल ५० हजार रुपये परत देत नाही, अशी कुरापत काढून कुऱ्हाडीने हल्ला चढवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सुनील राठोड व भागाबाई अंबादास राठोड यांना काठी व लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली. राजाभाऊ उत्तम पवार, श्रीमंत उत्तम पवार, उत्तम गेमा पवार, अभिषेक राजाभाऊ पवार, सुजाता राजाभाऊ पवार, झाडूबाई उत्तम पवार यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.

श्रीमंत उत्तम पवार (२९) यांच्या तक्रारीनुसार, २३ रोजी तुमचे उसणे घेतलेले ५० हजार रुपये देत नाही, असे म्हणत काठीने मारहाण करून जखमी केले. अंबादास भीमा राठोड व सुनील अंबादास राठोड यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.

....

Web Title: Ax attack on family for money reasons