शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

कमालच! शेतकऱ्याने दीड एकरावर महाकाय विहीर खोदून केली दुष्काळावर मात,१० कोटी लिटर पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 14:23 IST

सतत दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पन्नात घट होत असल्याने बारामाही पाणी पुरेल, अशी काहीतरी योजना आखण्याचे त्यांच्या डोक्यात होते.

- सखाराम शिंदेगेवराई (जि. बीड) : कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी-कधी अवकाळी.. यामुळे शेती व्यवसायाला जुगार खेळण्याजोगेच मानले जाते. मात्र, तालुक्यातील पाडळसिंगी येथे दीड एकरात विहीर खोदून राज्यात चर्चेत आलेले मारुती बजगुडे हे तीन वर्षे दुष्काळ पडला, तरी ५० एकर शेती हिरवीगार करू शकतात. १० कोटी लीटर पाणी साठवण क्षमता असलेली महाकाय विहीर खोदून त्यांनी कोरड्या दुष्काळावर कायमची मात केली आहे.

मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीडमध्ये होतात. निसर्गाच्या अवकृपेमुळे ही शेती तोट्यात चालली आहे. पाऊस कमी पडला तरी शेती पडीक राहू नये म्हणून शेतकरी आगळेवेगळे प्रयोग करीत आहेत. असाच एक प्रयोग पाडळसिंगी येथील मारोती बजगुडे यांनी केला. यांची १२ एकर शेती आहे. सोबतच त्यांचा मंडपाचा व्यवसाय असून, सतत दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पन्नात घट होत असल्याने बारामाही पाणी पुरेल, अशी काहीतरी योजना आखण्याचे त्यांच्या डोक्यात होते. शेततळ्याचा विचार केला मात्र त्यामध्ये मर्यादित पाणीसाठा राहतो, त्यामुळे त्यांनी आपल्या दीड एकर शेतामध्ये विहीर करण्याचे ठरवले. मात्र, सुरुवातीला यासाठी अनेक अडचणी आल्या, परंतु त्यावर मात करीत त्यांनी तीन वर्षांपूर्वी विहीर खोदण्यास सुरुवात केली.

या विहिरीतून निघालेला मुरुम त्यांनी महामार्गासाठी दिला. त्यातून त्यांना २० लाख रुपये मिळाले. काहीही झाले तरी मागे हटायचे नाही, हा निश्चय मनाशी धरून त्यांनी काम सुरू ठेवले. विहिरीचे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी साडेपाच परस खोलवरून सिमेंटने सर्व बाजूने कडे टाकले. या कामासाठी सहा महिने दररोज ८० मजूर राबत होते. शिवाय माती व दगड काढण्यासाठी १० ट्रक लावले होते.

मत्स्यपालनाचे नियोजनदरम्यान, दुरून पाहिल्यानंतर या ठिकाणी एखादे धरण किंवा तलाव असल्याचा भास होतो. १० हजार कोटी लीटर क्षमतेची महाराष्ट्रातील ही एकमेव विहीर असून, बजगुडे यांनी आपल्या १२ एकरपैकी ८ एकरात मोसंबीची लागवड केली आहे. तसेच या विहिरीमध्ये माशांचे बीजारोपण करण्यात आले असून, या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचा त्यांना मानस आहे.

आता उत्पन्न वाढेल सततच्या दुष्काळाला कंटाळून विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. विहिरीचे काम सुरू केले तेव्हा महाकाय विहीर खोदणे शक्य होईल का? अशी शंका होती. पण, अडचणींवर मात करीत काम पूर्ण झाले. यामुळे आता सलग तीन वर्षे दुष्काळ पडला तरी पाण्याची चिंता नाही. शेतीला मत्स्यव्यवसायाची जोड दिल्याने उत्पन्न वाढेल, असा विश्वास आहे.- मारोती बजगुडे, शेतकरी, पाडळसिंगी (ता. गेवराई)

 

टॅग्स :BeedबीडagricultureशेतीFarmerशेतकरी