कोरोना टाळण्यासाठी जनजागृती मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:33 IST2021-05-13T04:33:42+5:302021-05-13T04:33:42+5:30

अंबेजोगाई : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स व सतत हात ...

Awareness campaign to prevent corona | कोरोना टाळण्यासाठी जनजागृती मोहीम

कोरोना टाळण्यासाठी जनजागृती मोहीम

अंबेजोगाई : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स व सतत हात धुणे हा उपक्रम तालुक्यातील नागरिकांना समजून सांगणे, तसेच विविध अडचणींवर उपाय योजना सांगणे, त्या अंमलात आणण्यासाठी येथील आधार माणुसकीचा ही संस्था कार्य करत आहे.

हातावर पोट असणाऱ्यांना मदत द्या

बीड : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालल्याने लॉकडाऊनच्या धर्तीवर अनेक उद्योग, व्यवसाय बंद आहेत. परिणामी, अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. अनेक हातावर पोट असणाऱ्या घटकांना शासकीय मदतीची नितांत आवश्यकता आहे. जे बेरोजगार आहेत. त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी नागरिक, मजूर वर्गांमधून केली जात आहे.

यात्रा, उत्सवांना कोरोनाचा फटका

आष्टी : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील सर्व यात्रा, जत्रा, उत्सव, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा असे सर्व गर्दी होणारे कार्यक्रम शासनाच्या वतीने बंद ठेवण्यात आले आहेत. मार्चपासून ग्रामीण भागात गावोगावी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते, तर सर्वच यात्रा मोठ्या प्रमाणात असतात. अनेकांचे अर्थकारण या यात्रांवरच असते. यात्रा, उत्सव बंद ठेवल्याचा मोठा फटका ग्रामीण भागातील अर्थकारणावर होणार आहे.

राडी-मुडेगाव रस्त्यावर मोठे खड्डे

अंबेजोगाई : आठ महिन्यांपूर्वीच राडी ते मुडेगांव या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. शासनाने लाखो रुपये खर्च करून या रस्त्याचे डांबरीकरण केले. मात्र, काम करणाऱ्या कंत्राटदाराने या मुख्य रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्याने, या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता कंत्राटदारांच्या माध्यमातून पुन्हा करण्यात यावा, अन्यथा त्या कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी मुडेगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Awareness campaign to prevent corona