शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

बीड बसस्थानकातील गलिच्छ कँटीनला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 11:55 PM

बसस्थानकातील कॅन्टीनच्या स्वयंपाकघरात अस्वच्छता तसेच नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल, अशा प्रकारे अन्नपदार्थ तयार करुन विक्री करण्यात येत होते.

ठळक मुद्देअन्न, औषध प्रशासनाची कारवाई : सुधारणा होत नाही तोपर्यंत कँटीन बंद

बीड : बसस्थानकातील कॅन्टीनच्या स्वयंपाकघरात अस्वच्छता तसेच नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल, अशा प्रकारे अन्नपदार्थ तयार करुन विक्री करण्यात येत होते. याप्रकरणी अन्न औषध प्रशासनाने बुधवारी कारवाई करीत बसस्थानकातील कॅन्टीनला टाळे ठोकले आहे. जोपर्यंत सुधारणा केली जात नाही तोपर्यंत कॅन्टीन बंद राहणार आहे.बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त के. एन. दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मरेवार, अनिकेत भिसे यांनी बसस्थानकातील कॅन्टीनची तपासणी केली. यावेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आढळून आली. तसेच आरोग्यास हानीकारक असे अन्नपदार्थ तयार केले जात असल्याचे त्यांना दिसले. अन्न पदार्थ हाताळताना घ्यावयाची काळजी, तेथे असलेल्या कामगारांकडून घेतली जात नव्हती. तसेच स्वयंपाकघरामध्ये मोरीच्या पाईपमधून उंदीर, घूस येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे देखील यावेळी निदर्शनास आले. त्याचबरोबर नाली उघड्यावर असून, तेथेच स्वयंपाक केला जात असल्याचे दिसून आले. भाज्या बनविण्यासाठी लागणारे साहित्य अस्वच्छ आढळून आले. शुध्द पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था येथे नव्हती. तसेच कॅन्टीनमधील खिडक्या व स्वयंपाकघरात जळमटे दिसून आली. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो ही कारणे नमूद करीत जोपर्यंत नियमानुसार सर्व बाबी तयार केल्या जात नाहीत तोपर्यंत कॅन्टीन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.नागरिकांच्या होत्या तक्रारीबसस्थानकातील कॅन्टीनमध्ये प्रवासी तसेच शहरातील नागरिक अनेक वेळा खानपानासाठी जातात.मात्र, तेथे असलेल्या अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याच्या तक्रारी नागरिकांनी अन्न औषध प्रशासनाकडे केलेल्या होत्या.या तक्रारींची दखल घेत बुधवारी ही कारवाई करण्यात आली. तसेच इतर ठिकाणी देखील अशा प्रकारे अस्वच्छता आढळून आल्यास माहिती देण्याचे आवाहन अन्न औषध प्रशासन सहायक आयुक्त के.एन. दाभाडे यांनी केले.

टॅग्स :BeedबीडFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग