जिल्हा बँकेसाठी सरासरी ५८ टक्के मतदान, दुपारपर्यंत निकाल हाती येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:32 IST2021-03-21T04:32:58+5:302021-03-21T04:32:58+5:30
रविवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सर्व तालुक्यातून आलेल्या मतपेट्यांमधील मतपत्रिकांचे वर्गीकरण करण्याची प्रकिया होईल. नागरी बँका ...

जिल्हा बँकेसाठी सरासरी ५८ टक्के मतदान, दुपारपर्यंत निकाल हाती येणार
रविवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सर्व तालुक्यातून आलेल्या मतपेट्यांमधील मतपत्रिकांचे वर्गीकरण करण्याची प्रकिया होईल. नागरी बँका व पतसंस्था, प्रक्रिया आणि इतर मतदारसंघांत मतदार कमी असल्याने हा निकाल लवकर अपेक्षित आहे. त्यानंतर, प्रवर्ग मतदारसंघातील मतपत्रिकांचे प्रत्येकी २५ प्रमाणे गठ्ठे करून आठ किंवा त्यापेक्षा जास्त टेबलांवर मोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.
तालुका एकूण मतदान झालेले मतदान
बीड ३१२ १७०
शिरूर ६५ ०५३
पाटोदा ६० ०३२
आष्टी १७५ ०५६
गेवराई १७९ १६५
माजलगाव ७७ ७३
धारूर ५७ ३४
वडवणी ९१ ३२
परळी ११८ ५६
अंबाजोगाई ११४ ८३
केज ११४ ५२
--------
सरासरी अंदाजे टक्केवारी ५८.३२