शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सासूला मारहाण करीत पेटवण्याचा प्रयत्न; जावयाविरुध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 01:06 IST

गिरवली येथे जावयाने सासूला मारहाण करुन दगडाने तिचे डोके फोडले. तसेच अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची घटना ३ जानेवारी रोजी घडली

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : तालुक्यातील गिरवली येथे जावयाने सासूला मारहाण करुन दगडाने तिचे डोके फोडले. तसेच अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची घटना ३ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी सासूने दिलेल्या तक्रारीवरुन जावयाविरोधात बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रशांत उर्फ महादेव दिगंबर करपे (रा. जवळबन ता. केज ह.मु लातूर) असे अटक केलेल्या जावयाचे नाव आहे. त्याला दारुचे व्यसन असल्याने पत्नी आणि त्याच्यात सतत वाद होत असत. याला कंटाळून मागील दहा महिन्यांपासून प्रशांतची पत्नी माहेरी गिरवली येथे आई वडिलांकडे राहत आहे.दरम्यान, गरिवली येथे सासरच्या घरी येऊन प्रशांत नेहमी दारू पिऊन पत्नीला नांदायला चल म्हणून गोंधळ घालतो. तसेच सासरच्या मंडळींना शिवीगाळ करतो. यापुर्वी त्याने सासरच्या घरावर दगडफेक देखील केली होती. त्यानंतर याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा ३ जानेवारी रोजी प्रशांत हा दारूच्या नशेत गिरवली येथे आला. त्यानंतर त्याने पत्नीला नांदायला पाठवा म्हणत सासरवाडीच्या मंडळींना शिवीगाळ केली. सासू रमाबाई शहाजी आपेट (वय ६०) या घराबाहेर येऊन जावयाला समजावत होते. यावेळी जावयाने रमाबाई यांना दगडाने मारहाण करुन त्यांचे डोके फोडले आणि त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यावेळी इतर मंडळींनी प्रशांतला थांबवले त्यामुळे काही पुढील घटना टळली.या प्रकरणी रमाबाई शहाजी आपेट यांनी बर्दापूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन जावई प्रशांत उर्फ महादेव दिगंबर करपे याच्या विरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.७ जानेवारीपर्यंत कोठडीया प्रकरणातील जावई प्रशांत उर्फ महादेव याला पोलिसांनी अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर केले असता, ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पो. नि. लक्ष्मण केंद्रीय हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFamilyपरिवार