अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:32 IST2021-05-15T04:32:49+5:302021-05-15T04:32:49+5:30

बीड : शौचासाठी घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी आठजणांवर १३ मे रोजी गेवराई ठाण्यात ...

Attempted overdose on a minor girl | अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

बीड : शौचासाठी घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी आठजणांवर १३ मे रोजी गेवराई ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा, विनयभंग व ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वी शहरातील १३ वर्षीय मुलगी नात्यातील महिलेसोबत घराबाहेर पडली होती. यादरम्यान याच भागातील आठजण अचानक समोर येऊन थांबले. त्यांनी अल्पवयीन मुलीची छेड काढून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीने आरडाओरड केल्यानंतर तिचा मावसभाऊ त्याठिकाणी धावत आला. यावेळी एकाने त्यास मारहाण केली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून अज्ञात आठजणांवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा, विनयभंग व ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड तपास करीत आहेत. दरम्यान, आरोपींची नावे समजू शकली नाहीत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: Attempted overdose on a minor girl