तरुणास विष पाजण्याचा प्रयत्न, सात जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:37 IST2021-09-27T04:37:28+5:302021-09-27T04:37:28+5:30

आमच्या विरोधात केलेली केस मागे घे, असे म्हणत एका तरुणाला मारहाण करून विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही ...

Attempt to poison youth, crime against seven | तरुणास विष पाजण्याचा प्रयत्न, सात जणांवर गुन्हा

तरुणास विष पाजण्याचा प्रयत्न, सात जणांवर गुन्हा

आमच्या विरोधात केलेली केस मागे घे, असे म्हणत एका तरुणाला मारहाण करून विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना तालुक्यातील लोणवळ तांडा येथे २५ सप्टेंबर रोजी घडली. सात जणांविरोधात वडवणी ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

रोहिदास श्रीराम राठोड (३२, रा. लोणवळ तांडा) असे त्या तरुणाचे नाव आहे. ८ ऑगस्ट २०२१ रोजी ते आपल्या घरी असताना रामदास राठोड, जयश्री राठोड, पृथ्वीराज राठोड (सर्व रा. माजलगाव) यांच्यासह अन्य अनोळखी चार जणांनी त्यांच्या घरात प्रवेश करून आमच्यावर दाखल केलेली केस मागे घे म्हणत रोहिदास यांना बेदम मारहाण केली. त्यांनी सोबत आणलेल्या बाटलीमधील विष रोहिदास यांना पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यासाठी रोहिदास राठोड यांनी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर घटनेच्या दीड महिन्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला.

Web Title: Attempt to poison youth, crime against seven