चारित्र्याच्या संशयातून आत्याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 19:14 IST2017-09-17T19:13:35+5:302017-09-17T19:14:03+5:30
तालुक्यातील माली पारगाव येथील नवनाथ चाफाकानडे (२५) व सुनील चाफाकनडे या सख्ख्या भावांनी चारित्र्याच्या संशयातून आत्या निर्मला रामभाऊ पोपळघट (४०, रा. कानेगाव खडकी ता. सोनपेठ, ह. मु. माली पारगाव) हिचा कुºहाडीने घाव घालून खून केला.

चारित्र्याच्या संशयातून आत्याचा खून
माजलगाव (जि. बीड) : तालुक्यातील माली पारगाव येथील नवनाथ चाफाकानडे (२५) व सुनील चाफाकनडे या सख्ख्या भावांनी चारित्र्याच्या संशयातून आत्या निर्मला रामभाऊ पोपळघट (४०, रा. कानेगाव खडकी ता. सोनपेठ, ह. मु. माली पारगाव) हिचा कुºहाडीने घाव घालून खून केला. ही घटना शनिवारी रात्री ११ च्या दरम्यान घडली. खून करून दोघे भाऊ ग्रामीण पोलिसांत हजर झाले.
निर्मला पोपळघट या आपल्या पतीबरोबर वाद घालून मागील दोन वर्षांपासून मालीपारगाव या माहेरगावी भावाच्या घराशेजारी पत्र्याचे शेडमध्ये राहत होत्या. त्यांचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मुलांच्या लग्नकार्यात अडथळे येऊ लागले. या सर्व गोष्टींमुळे त्रस्त झालेल्या नवनाथ व सुनील या भाच्यांनी आत्याला संपविण्याचा निर्णय घेतला. शनिवारी रात्री १० ते ११ च्या दरम्यान पत्र्याच्या शेडमध्ये आत्या झोपली असता तिच्या मानेवर कुºहाडीने घाव घालून तिचा खून केला. दोघांनीही गुन्हा करून ग्रामीण पोलीस ठाण्यात येत असताना सावरगाव येथील झुडपात कुºहाड फेकून दिली. ग्रामीण पोलीस ठाण्यात येऊन ठाणे अंमलदार संदीप मोरे यांना घटना सांगितली. मोरे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ नरके करीत आहेत.
-------------