कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य अधिकाऱ्यांचे आष्टीत ठाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:23 IST2021-07-11T04:23:22+5:302021-07-11T04:23:22+5:30
आष्टी येथील तालुका आरोग्य अधिकारी पद रिक्त आहे. कडा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन मोरे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात ...

कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य अधिकाऱ्यांचे आष्टीत ठाण
आष्टी येथील तालुका आरोग्य अधिकारी पद रिक्त आहे. कडा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन मोरे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे. डॉ.मोरे यांनी तालुक्यात नवनवीन संकल्पना घेऊन कोरोना नियंत्रणात ठेवला होता, परंतु मागील काही दिवसांपासून नियोजन बिघडल्याने रुग्णसंख्या वाढली आहे. महसूल व पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळत नसल्याने, आरोग्य यंत्रणेला नियोजनात अडथळे येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यामुळेच कोरोना नियमांचे उल्लंघन झाले आणि रुग्णसंख्या वाढली. आता ती आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणेची धावपळ होत आहे. डॉ.मोरे या नवख्या अधिकाऱ्याला सहकार्य व्हावे, यासाठी डॉ.पवार यांनी बीडचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयवंत मोरे आणि बीडचे अनुभवी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट यांना पर्यवेक्षणाची जबाबदारी दिली आहे. याबरोबरच डॉ.मिर्झा बेग, डॉ.सतीश शिंदे, डॉ.संतोष गुंजकर, डॉ.ज्ञानेश्वर निपटे यांना एक वार देत आढावा घेण्याच्या सूचना केल्या आहेत. उपाययोजनांसह सूचनांचे कठोर पालन झाल्यास आष्टीतील रुग्णसंख्या आटोक्यात येईल, असा विश्वास डॉ.पवार यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, शनिवारी दिवसभर डॉ.मोरे, डॉ.कासट, डॉ.बेग हे अधिकारी तालुक्यातील विविध गावांत जाऊन आढावा घेत होते, तसेच कडा आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी यांची बैठक घेऊन सूचना केल्या. कामात हलगर्जी केल्यास कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.
100721\10_2_bed_36_10072021_14.jpeg
आष्टीत कोरोना उपाययोजनांसाठी डॉ.जयवंत मोरे, डॉ.नरेश कासट, डॉ.मिर्झा बेग, डॉ.नितीन मोरे हे ठाण मांडून होते.