आष्टीत मॅरेथाॅन स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:33 IST2021-01-03T04:33:20+5:302021-01-03T04:33:20+5:30

कडा - दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आष्टी शहरात दिनांक ६ जानेवारी रोजी मॅरेथाॅन स्पर्धेचे आयोजन केले असून, या ...

Ashtit marathon competition | आष्टीत मॅरेथाॅन स्पर्धेचे आयोजन

आष्टीत मॅरेथाॅन स्पर्धेचे आयोजन

कडा - दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आष्टी शहरात दिनांक ६ जानेवारी रोजी मॅरेथाॅन स्पर्धेचे आयोजन केले असून, या स्पर्धेत केवळ ५० स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे. ज्या स्पर्धेकांना या मॅरेथाॅनमध्ये सहभाग घ्यायचा आहे, त्यांनी त्वरित नावनोंदणी करावी, असे आवाहन आष्टी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रघुनाथ कर्डिले यांनी केले आहे.

आष्टी तालुका पत्रकार संघ, नगर पंचायत, आष्टी यांनी संयुक्तरित्या ही स्पर्धा आयोजित केली आहे. आष्टी शहरात नगर पंचायतीकडून ‘माझी वसुंधरा’ कार्यक्रमांतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून, याचदिवशी सकाळी सात वाजता शहरात मॅरेथाॅन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृृृृृृतीय क्रमांकांना अनुक्रमे पाच हजार, तीन हजार व दोन हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार असून, सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेकांनी आपल्या नावाची नोंदणी जोगेश्वरी न्यूज पेपर एजन्सी गुरव याठिकाणी करावी, असे आवाहनही संघाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Ashtit marathon competition