आष्टीचे शासकीय विश्रामगृह असून अडचण नसून खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:29 IST2021-04-05T04:29:36+5:302021-04-05T04:29:36+5:30
आष्टी : नगर - बीड रस्त्यालगत असलेले आष्टी येथील शासकीय विश्रामगृह सध्या अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले असून, या ...

आष्टीचे शासकीय विश्रामगृह असून अडचण नसून खोळंबा
आष्टी : नगर - बीड रस्त्यालगत असलेले आष्टी येथील शासकीय विश्रामगृह सध्या अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले असून, या शासकीय विश्रामगृहाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचे एकूण १ लाख १८ हजार रुपये वीजबिल थकले आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे येथे अंधाराचे साम्राज्य आहे.
आष्टी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी नगर बीड रस्त्यालगत असलेल्या शासकीय विश्रामगृहात पाणी नाही. आमदार, प्रमुख अधिकारी, पदाधिकारी, महत्त्वाची व्यक्ती येथे ये - जा करताना थांबत असतात. मात्र, सध्या या विश्रामगृहात वीज नसल्यामुळे विजेवरची सर्व साधने बंद पडली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचे आणि शासकीय विश्रामगृहाचे तब्बल १ लाख १८ हजार रुपयांचे वीज बिल थकल्यामुळे महावितरण कंपनीने वीज पुरवठा तोडला आहे. परिणामी सध्या येथे पिण्यासाठी पाणी नाही. राहण्याची काही सुविधा नाही. स्वच्छता नाही. बाथरूम मध्येही अस्वच्छता, फरशा तुटलेल्या आणि पडलेल्या बाटल्या पाहायला मिळतात. प्रमुख ठिकाणी असलेली ही सरकारी वास्तू असून अडचण नसून खोळंबा अशीच बनल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक बांधकाम कार्यालयातील आणि शासकीय विश्राम गृहाचे एकूण मिळून १ लाख १८ हजार रुपये वीजबिल थकलेले आहे. त्यामुळे वीजबिल न भरल्यामुळे नाईलाजास्तव वीज कनेक्शन कट करावे लागल्याचे लाईनमन शिवाजी गोरे यांनी सांगितले.
===Photopath===
040421\04bed_1_04042021_14.jpg