शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

मुंबई बाजार समिती निवडणूकीत अशोक डक बंपर मतांनी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 17:06 IST

अशोक डकांच्या रूपाने प्रथमच मिळाला बीड जिल्ह्याला बहुमान

ठळक मुद्देऔरंगाबाद महसुल विभागातून दणदणीत विजय

माजलगाव :  माजलगाव येथील बाजार समितीचे सभापती अशोक डक यानी मुंबई बाजार समितीच्या निवडणूकीत औरंगाबाद महसुल विभागातून नशिब आजमावले होते. त्यासाठी रविवारी मतदान होवून सोमवारी (दि.२ ) निकाल जाहिर झाला. यात अशोक डक यानी २२५ मतांनी बंपर विजय मिळवला. अशोक डक यांच्या या विजयाने जिल्ह्याला मुंबई बाजार समितीवर प्रतिनिधीत्व करण्याचा प्रथमच बहुमान मिळाला आहे.

मुंबई बाजार समितीसाठी दि.२९ फेब्रुवारीस मतदान प्रक्रिया पार पडली. औरंगाबाद महसुल विभागासाठी ९५६ मतदार होते. त्यापैकी ९४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. औरंगाबाद महसुल विभागातून राष्ट्रवादी-कॉग्रेस-शिवसेना महाविकास आघाडीकडून माजलगाव बाजार समितीचे सभापती अशोक डक, लातुरचे माजी आ.वैजनाथराव शिंदे हे मैदानात होते. तर भाजपाकडून औरंगाबाद बाजार समितीचे सभापती राधाकृष्ण पठाडे, चाकुर बाजार समितीचे सभापती प्रशांत पाटील या दिग्गज उमेदवरांसह ११ उमेदवार नशिब आजमावत होते. 

बीड जिल्ह्याला प्रथमच मुंबई बाजार समितीसाठी औरंगाबाद महसुल विभागातून अशोक डक यांच्या रूपाने उमेदवारी मिळाली होती. त्यामुळे जिल्ह्याभरातील जनतेचे या निवडणूकीच्या निकालाकडे लक्ष लागले होते. आज सोमवारी (दि.२) जाहिर झालेल्या निकालात ९४४ मतापैकी ६५० मते मिळवत अशोक डक यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर २२५ मतांनी विजय मिळवला. त्यांच्या विजयाबद्दल माजलगाव शहरासह जिल्ह्याभरात आतिषबाजी करून आनंद साजरा करण्यात आला.

पवार कुटूंबाच्या एकनिष्ठेचे फळ डकांना मिळणार शरद पवार यांच्या अडचणीच्या काळात गोविंदराव डक यांनी त्यांना माजलगाव मतदार संघातून साथ दिली होती. तसेच पुढे ही अशोक डक यांनी वडिल गोविंदराव डक यांच्या पावलावर पाऊल टाकत पवार कुटूंबाशी एकनिष्ठता कायम राखली. त्यामुळे जिल्ह्याला अशोक डक यांच्या रूपाने मुंबई बाजार समितीचे संचालकपद मिळाले. आत्ता याच एकनिष्ठतेचे फळ म्हणून मुंबई बाजार समितीचे सभापती पदी वर्णी लागणार का ? याची उत्सुकता जिल्हावासियांना लागली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBeedबीडMarathwadaमराठवाडाmarket yardमार्केट यार्ड