शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

राखेच्या टिप्परची धडक, सौंदना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 13:34 IST

या अपघात प्रकरणी पोलिसांनी राखेचे टिप्पर पोलीस ठाण्यात आणून लावले आहे. रविवारी  सकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात सरपंच अभिमन्यू  क्षीरसागर यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात येत आहे. 

 परळी : राखेच्या टिप्परच्या धडकेने मोटरसायकल वरील अंबाजोगाई तालुक्यातील सौंदना गावचे  राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान सरपंच  अभिमन्यू पांडुरंग क्षीरसागर  (वय 45 ) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघात प्रकरणी पोलिसांनी राखेचे टिप्पर पोलीस ठाण्यात आणून लावले आहे. रविवारी  सकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात सरपंच अभिमन्यू  क्षीरसागर यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात येत आहे. 

11 जानेवारी रोजी रात्री आठच्या सुमारास सौंदना येथील सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे परळी कडे घरी येण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. त्यांना परळी तालुक्यातील मिरवट -मांडवा पाटी जवळ परळीहून धर्मापुरी कडे जाणाऱ्या राखेच्या  एका टिप्परने धडक दिली. धडक जोराचे दिल्याने दुचाकी वरील सरपंचाचा खाली पडून मृत्यू झाला. ही घटना रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान घडली. घटना  कळताच  परिसरातील ग्रामस्थ ही मदत कार्यासाठी धावून आले व परळी ग्रामीण पोलिसांना ही माहिती कळविण्यात आली. 

परळी ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद जाधव, गोविंद बडे, वाहन चालक महादेव वाघमारे हे तातडीने घटनास्थळी पोहोचले व रात्री  सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृतदेह  परळी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. सौंदना तालुका अंबाजोगाई येथे त्यांच्यावर  रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अभिमन्यू क्षीरसागर  यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन भाऊ ,एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. सौंदना गावात त्यांचे घर  व शेती आहे. शनिवारी शेतातील सोयाबीन भरून घेतले आणि टेम्पो ने घरी आणले. व दुचाकी वर एकटेच परळी कडे  निघाले. परळीच्या जलालपूर भागात ही ते रहात होते. परळीला पोहचण्यापूर्वीच त्यांचा अपघात झाला. अभिमन्यू क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित दादा पवार पक्षाचे )सौंदना गावचे सरपंच होते.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू