शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

राख माफियांना ब्रेक! वाल्मीक कराडची मक्तेदारी असणाऱ्या परळीतून बंदोबस्तात राखेचा उपसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 17:42 IST

नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातून वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या दगडी कोळशाच्या जळणानंतर तयार होणारी पौंड राख ही दाऊतपूर बंधाऱ्यात सोडण्यात येते.

परळी : राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मीक कराडची मक्तेदारी ही परळीतील अवैध राख उपसा, वाहतूकीच्या ठिकाणी होती, असा आरोप आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह इतरांनी केला होता. त्यामुळे तीन महिन्यांपासून राख उपसा बंद होता. पण आता हीच मक्तेदारी मोडीत काढत २ एप्रिलपासून पोलिस बंदोबस्तात थर्मलमधून निघालेली राख उचलली जात आहे. १८ जणांनी निविदा भरल्या आहेत. तसेच या ठिकाणी २४ तास खासगी व पोलिस असा १८ लोकांचा बंदोबस्त तैनात आहे. दरम्यान, वाल्मीक कराड हा सध्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारागृहात आहे.

नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातून वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या दगडी कोळशाच्या जळणानंतर तयार होणारी पौंड राख ही दाऊतपूर बंधाऱ्यात सोडण्यात येते. ही राख अनाधिकृतपणे उपसा केली जात होती. यात आमदार धनंजय मुंडे, वाल्मीक कराड यांचेच कार्यकर्ते असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून राख उपसा बंद होता. आता माजी मंत्री धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांची मक्तेदारी मोडीत काढून हा उपसा सुरू आहे.

१८ जणांनी भरली निविदाराख उपसा करण्यासाठी २०२३ मध्ये १८ जणांनी निविदा व त्याची रक्कमही भरली होती. २०२४ मध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात २ एप्रिल रोजी राखेचा उपसा करण्यास त्यांना परवानगी दिली. यासाठी १८ जणांनी ३५३ रुपये प्रति टन व जीएसटी आकारून राख उचलणे सुरू केले आहे.

कोठून किती राख?दाऊदपूरच्या राख बंधाऱ्यातील ८० टक्के राख ही १८ निविदाधारकांना उचलण्यास परवानगी देण्यात आली आहे, तर २० टक्के राख ही दाऊतपूर, दादाहारी वडगाव येथील प्रकल्पग्रस्तांना उचलण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. २० टक्केचा कोटा उचलण्यास तातडीने परवानगी देण्याची मागणी ही दाऊतपूर राख नियंत्रण कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

निर्णयाची अंमलबजावणी करावीपोलिस बंदोबस्तात अधिकृत निघालेल्या निविदेनुसार दाऊतपुर राख बंधाऱ्यातून राखेचा उपसा चालू आहे. दाऊतपूर येथून राख उपसा व वाहतूक चालू असताना प्रदूषण होऊ नये, यासाठी घालून दिलेल्या नियमाची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. प्रकल्प बाधित गावच्या लोकांसाठी दाऊतपूर राख कोटा २० टक्के असून, या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी.- श्रीकांत फड, सरपंच दाऊतपूर

राख उपसा पोलीस बंदोबस्तातदाऊतपूर येथील पाैंड राखेच्या विक्रीची निविदाप्रक्रिया पूर्ण केली. दाऊतपूर राख तलाव (बंधारा) मधील ५० टक्के कोट्यातील राख साठा उचलण्यासाठी १८ एजन्सी पात्र असून २ एप्रिलपासून राख उपसा पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आला आहे. तसेच नियम व अटी लावण्यात आलेले आहेत. प्रकल्प बाधित गावच्या लोकांसाठी २० टक्के राख साठा राखीव असून, त्यासाठी १५० जणांचे अर्ज आले आहे. याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.- सुनील इंगळे, मुख्य अभियंता औष्णिक विद्युत केंद्र, परळी

 

टॅग्स :BeedबीडBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याwalmik karadवाल्मीक कराड