परळी शहरात राखेचे प्रदूषण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:23 IST2021-06-25T04:23:48+5:302021-06-25T04:23:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परळी, : शहरातील वैद्यनाथ मंदिरामार्गे राखेच्या वाहनांची वाहतूक जोरात सुरू आहे. यामुळे उडणाऱ्या धुळीचा नागरिकांना त्रास ...

परळी शहरात राखेचे प्रदूषण वाढले
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी, : शहरातील वैद्यनाथ मंदिरामार्गे राखेच्या वाहनांची वाहतूक जोरात सुरू आहे. यामुळे उडणाऱ्या धुळीचा नागरिकांना त्रास होत आहे. राखेमुळे शहरात प्रदूषण वाढले आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तरी ही वाहतूक बंद करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
परळी औष्णिक विद्युत केंद्रातील राखेची वाहतूक वाहनांद्वारे केली जाते. राख घेऊन जाणारे वाहने सध्या शहरातील पोलीस स्टेशन समोरून व वैद्यनाथ मंदिरमार्गे जात आहेत. यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. वाहतुकीच्या वेळी वाहनातील राख रस्त्यावर पडत आहे. या राखेचे कण लोकांच्या डोळ्यात जात आहेत. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर देखील होत आहे. तरी वैद्यनाथ मंदिरमार्गे होणारी राखेची वाहतूक बंद करावी व प्रदूषण टाळावे, अशी मागणी प्रदूषण समितीने केली आहे. परंतु प्रशासनाने या मागणीला केराची टोपली दाखविली आहे.