सराफा व्यापा-याला चिरडणा-या कोल्हापूरच्या ‘आर्या गँग’चा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:44 IST2018-02-14T23:43:54+5:302018-02-14T23:44:02+5:30
केज तालुक्यातील कुंबेफळ येथील सराफा व्यापारी विकास थोरात यांना कारने चिरडून दागिन्यांची बॅग लुटणा-या कोल्हापूरच्या ‘आर्या गँग’चा अवघ्या चार तासांत बीड पोलिसांनी पर्दाफाश केला. टोळीच्या म्होरक्यासह चौघांना मंगळवारी मध्यरात्री गजाआड केले. तसेच चोरीतील मुद्देमालही हस्तगत केला आहे.

सराफा व्यापा-याला चिरडणा-या कोल्हापूरच्या ‘आर्या गँग’चा पर्दाफाश
बीड : केज तालुक्यातील कुंबेफळ येथील सराफा व्यापारी विकास थोरात यांना कारने चिरडून दागिन्यांची बॅग लुटणा-या कोल्हापूरच्या ‘आर्या गँग’चा अवघ्या चार तासांत बीड पोलिसांनी पर्दाफाश केला. टोळीच्या म्होरक्यासह चौघांना मंगळवारी मध्यरात्री गजाआड केले. तसेच चोरीतील मुद्देमालही हस्तगत केला आहे.
अमोल उर्र्फ आर्याभाई संभाजी मोहिते (३५ रा.कापशी ता.कागल, जि.कोल्हापूर), अमर लक्ष्मण सुतार (३९ रा.महादेव गल्ली रा.निपाणी जि.बेळगाव), महादेव रमेश डोंगरे, (२१ रा.सोनीजवळा ता.केज, जि.बीड), अतुल रमेश जोगदंड (२० रा.सोनीजवळा ता.केज, जि.बीड) अशी ताब्यात घेतलेल्या चोरट्यांची नावे आहेत. अमोल हा टोळीचा म्होरक्या आहे. व्यापारी विकास थोरात हे दुचाकीवरून घरी जात असताना मंगळवारी रात्री या टोळीने त्यांना कारखाली चिरडून ठार केले व सोन्या-चांदीच्या दागिन्यांची बॅग लुटली.
माहिती समजताच पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत नाकाबंदी केली. पहाटे चार वाजेपर्यंत सर्व चोरट्यांना मुद्देमालासह गजाआड केले. ही कारवाई पोलीस जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, धारूरचे पोलीस निरीक्षक जे.एल.तेली, केजचे पोलीस निरीक्षक एस.जे.माने, अंबाजोगाई ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गंधम, युसूफवडगावचे सपोनि राहुल देशपांडे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचा-यांनी केली.
कुख्यात अमोलवर कोल्हापुरमध्ये ‘मोका’
अमोल मोहिते हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत गंभीर २० च्या वर गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्यावर कोल्हापूरमध्ये मोका लावण्यात आलेला आहे. कोल्हापुरसह इतर ठिकाणी तो ‘वॉन्टेड’ होता.
नागरिकांचे सहकार्य आणि अधिकारी, कर्मचा-यांचे परिश्रम
घटनेची माहिती मिळताच नाकाबंदी करून शोध मोहीम हाती घेतली. नागरिकांचे सहकार्य आणि अधिकारी, कर्मचा-यांच्या परिश्रमामुळे टोळीला गजाआड करता आले.
जी.श्रीधर
पोलीस अधीक्षक, बीड