घोड्यावर बसून वकिलाचे न्यायालयात आगमन - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:58 IST2021-03-13T04:58:57+5:302021-03-13T04:58:57+5:30
बीड : राज्यातील अनेक जिल्ह्यांत आज इंधन दरवाढ झाली आहे. शंभरी ओलांडली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक ...

घोड्यावर बसून वकिलाचे न्यायालयात आगमन - A
बीड : राज्यातील अनेक जिल्ह्यांत आज इंधन दरवाढ झाली आहे. शंभरी ओलांडली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक कोंडीत सापडला आहे. या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ १० मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या अॅड. हेमा पिंपळे या न्यायालयात घोड्यावर बसून आल्या होत्या. त्यांच्या या अनोख्या आंदोलनाने यावेळी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
केंद्र सरकार इंधनाच्या दरांमध्ये सवलत देण्यास तयार नाही. दिवसेंदिवस महागाईचा आलेख वाढत चालला आहे. या वाढत्या भाववाढीमुळे सर्वसामान्य त्रस्त झाला आहे. इंधन दरवाढीमुळे वाहनधारकांना वाहने परवडत नसल्याचे सांगत निषेध नोंदविण्यासाठी आपण घोड्यावरून आल्याचे ॲड. पिंपळे यावेळी म्हणाल्या. दरम्यान केंद्र सरकारने इंधनदरवाढ कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.