कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:26 IST2021-02-05T08:26:29+5:302021-02-05T08:26:29+5:30
शिरूर-केज रस्त्याची दुरवस्था केज : तालुक्यातील शिरूर ते केज रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना त्रास ...

कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन
शिरूर-केज रस्त्याची दुरवस्था
केज : तालुक्यातील शिरूर ते केज रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यालगत गाव, वाड्या, वस्त्या आहेत. नागरिकांची बाजारपेठ केज असल्यामुळे वावर जास्त असते.
महावितरणला समस्यांचे ग्रहण
अंबाजोगाई : ग्रामीण भागात सध्या विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विजेची मागणी ज्याप्रमाणे वाढत चालली आहे. त्याप्रमाणे विजेचा पुरवठा उपलब्ध होत नाही. परिणामी अनेक विद्युत पंप अपुऱ्या वीज पुरवठ्याअभावी बंद पडू लागले आहेत. ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त स्थितीत असल्याने ट्रान्सफॉर्मरसाठी लागणारे पार्ट, ऑइलची कमतरता आहे.
घाणीमुळे भिंती रंगल्या
बीड : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या कोपऱ्यांमध्ये नागरिक व अधिकारी - कर्मचारी गुटखा खाऊन थुंकतात. त्यामुळे सर्वत्र घाण झाली आहे. थुंकल्यामुळे भिंती रंगलेल्या दिसत आहेत. शिस्त लावत हा परिसर स्वच्छतेची मागणी होत आहे.
वृक्षतोड थांबवावी
पाटोदा : तालुक्यातील डोंगरकिन्ही, अंमळनेर, वैद्यकिन्ही, निरगुडी, नायगाव या परिसरात सर्रासपणे अवैध वृक्षतोड होत असल्याचे दिसत आहे. वन विभागाकडून कारवाईकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप वृक्षमित्रांमधून केला जात आहे. वृक्षतोड थांबविण्याची मागणी आहे.
नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त
अंबाजोगाई : काही दिवसांपासून अंबाजोगाई व परिसरात बीएसएनएलची रेंज उपलब्ध होत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. इंटरनेटही चालत नाही. परस्परांशी संवादही होत नाही. महागडे रिचार्ज करूनही ग्राहक अडचणीत आहेत. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही दखल घेण्यात येत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत.