शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

'अप्पा, तुमचा आवाज आजही कानात घुमतो'; गोपीनाथ गडावर धनंजय मुंडे भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 12:28 IST

' ३ जूनचा काळा दिवस आजूनही आठवतो, तो दिवस उजाडलाच नसता तर...'

परळी ( बीड ) : लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या स्मृती दिनी परळी येथील गोपीनाथ गड येथे आज सकाळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दर्शन घेतले. यावेळी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने धनंजय मुंडे भावूक झाले. सकाळीच ट्विटकरून त्यांनी, ' ३ जूनचा काळा दिवस आजूनही आठवतो, तो दिवस उजाडलाच नसता तर...' अशा भावना व्यक्त केल्या होत्या. 'अप्पा तुमचा आवाज आजही कानात घुमतो', अशी साद घालत मंत्री मुंडे यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. तसेच स्व. गोपीनाथ मुंडे आज असते तर राज्यातील राजकारण वेगळे असते, असेही ते यावेळी म्हणाले. 

परळी येथील गोपीनाथ गड येथे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी अलोट गर्दी उसळली आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील आज सकाळी गोपीनाथ गड येथे जाऊन दर्शन घेतले. यावेळी मंत्री मुंडे यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. स्व. गोपीनाथ मुंडे आज असते तर राज्यातील राजकारण वेगळे असले असते. जे मागील पाच सहा वर्षांपासून सुरु आहे ते झाले नसते अशी आशा व्यक्त केले. यासोबतच त्यांचे सामान्य माणसांप्रती, उसतोड मजुरांसाठी असलेले स्वप्न आज सत्तेत असताना मी पूर्ण करत करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच अनेक वर्ष त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहिल्याने त्यांची कुटुंबातील, सामाजिक, राजकीय जीवनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहील अशी ग्वाही मंत्री मुंडे यांनी दिली.     

सुप्रिया सुळे यांच्या भेटीवर राजकीय विरोध वेगळा. संघर्षातून निर्माण झालेले नेतृत्व आपल्यातून निघून गेल्यानंतर त्यांच्या स्मृतींपुढे नतमस्तक होणे स्वाभाविक आहे. आजच्या पिढीच्या कुठल्याही नेत्याकडून स्वयंस्फुर्तीने, मनातून झालेले कृत्य आहे, असे मत मंत्री मुंडे यांनी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांच्या गोपीनाथ गडास भेटीवर व्यक्त केले. 

 

वडिलांसोबत वाद घालून मला राजकारणात आणले स्व. गोपीनाथ मुंडे यांनी ते ज्या जिल्हा परिषद गटातून निवडून आले होते तेथे मला उभे करण्याचा निर्णय घेतला. यासाठी प्रसंगी माझे वडील स्व. पंडित अण्णा यांच्यासोबत त्यांनी वाद घातला. त्या गटातून मी निवडणूक लढवली आणि माझ्या सक्रीय राजकारणाची सुरुवात झाली. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी त्यावेळी मला तिकीट देण्याचा घेतलेला तो निर्णय, तो विजय माझ्यासाठी कलाटणी देणारा ठरला. स्व. मुंडे यांची प्रेरणा घेऊन माझे कार्य अखंड सुरु असल्याची ग्वाही मंत्री मुंडे यांनी दिली. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेGopinath Mundeगोपीनाथ मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाBeedबीड