१४९ संशयितांची अँटिजन टेस्ट; तीन पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:37 IST2021-05-25T04:37:35+5:302021-05-25T04:37:35+5:30

: तालुक्यातील नित्रुड येथे मागील दोन महिन्यांच्या काळात मोठ्या प्रमाणावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची आढळून आल्याने आरोग्य विभागाने या ...

Antigen tests of 149 suspects; Three positives | १४९ संशयितांची अँटिजन टेस्ट; तीन पॉझिटिव्ह

१४९ संशयितांची अँटिजन टेस्ट; तीन पॉझिटिव्ह

: तालुक्यातील नित्रुड येथे मागील दोन महिन्यांच्या काळात मोठ्या प्रमाणावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची आढळून आल्याने आरोग्य विभागाने या गावातील नागरिकांच्या अँटिजन चाचणीला सोमवारी सकाळी सुरुवात केली होती. यात १४९ नागरिकांची चाचणी केली असता, केवळ तीन नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत माजलगाव शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रभाव दिसून आला. तालुक्यातील दहा ते बारा गावांत कोरोनाने कहरच केला होता. तालुक्यातील नित्रुड, दिंद्रुड, वांगी, लउळ, हारकी लिमगाव, उमरी, चोपणवाडी, भाटवडगाव, आनंदगाव, निपाणी टाकळी, नागडगाव आदी गावे रेडझोनमध्ये आलेली आहेत. या गावात कोरोना चाचणी जास्तीत जास्त व्हाव्यात म्हणून सोमवारी नित्रुडमध्ये अँटिजन चाचणीला सुरुवात करण्यात आली.

नित्रुड येथे सकाळपासून या चाचण्या करण्यात आल्या. दुपारपर्यंत १४९ नागरिकांच्या चाचणीत एक व्यापारी, एक महिला व एक वृद्ध असे तिघे पॉझिटिव्ह आल्याची माहिती ग्रामसेवक टी. डी. अजबे यांनी दिली.

कीट संपताच चाचणी बंद

सकाळपासून चाचण्या करण्यात आल्या. कीट संपल्याने दुपारीच चाचण्या बंद करण्यात आल्या. नित्रुडमध्ये दुसऱ्या लाटेत १७९ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले, तर यातील १८ नागरिकांचा यात मृत्यू झाला होता.

शासनाने यापुढे गावात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची व्यवस्था गावातच एखाद्या शाळेत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आम्ही गावातील शाळेत याची व्यवस्था केली आहे; परंतु आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये दोन बीडला, तर एक माजलगाव येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत.

--- कॉ. दत्तात्रय डाके, सरपंच, नित्रुड.

===Photopath===

240521\purusttam karva_img-20210524-wa0073_14.jpg

Web Title: Antigen tests of 149 suspects; Three positives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.