आणखी १८ शिक्षक कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:33 IST2021-01-25T04:33:53+5:302021-01-25T04:33:53+5:30
पाचवी ते आठवीपर्यंत शाळा २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. त्याअनुषंगाने सर्वच शिक्षकांची कोरोना चाचणी केली जात आहे. शुक्रवारी १७ ...

आणखी १८ शिक्षक कोरोनाबाधित
पाचवी ते आठवीपर्यंत शाळा २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. त्याअनुषंगाने सर्वच शिक्षकांची कोरोना चाचणी केली जात आहे. शुक्रवारी १७ शिक्षक यात बाधित आढळले होते. शनिवारी पुन्हा ८८२ शिक्षकांची ॲन्टिजेन व आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. ॲन्टिजेनमध्ये पुन्हा १८ शिक्षक बाधित आढळले. अद्यापही १५२ शिक्षकांचे अहवाल प्रलंबित आहेत. रविवारी दुपारनंतर ते येतील, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, बाधित शिक्षकांची संख्या वाढत असल्याने पालकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
शिरुरमध्ये सर्वाधिक ११ शिक्षक
शिरुर तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक शिक्षक कोरोनाबाधित आढळले आहेत. शुक्रवारी ११ शिक्षक बाधित आढळल्यानंतर शनिवारी पुन्हा तेवढेच शिक्षक बाधित आढळले. आता या तालुक्याचा एकूण आकडा २२ झाला आहे. तसेच शनिवारी आढळलेल्या १८ बाधित शिक्षकांमध्ये अंबाजोगाई १, बीड ४, परळी २ व शिरुरमधील ११ शिक्षकांचा समावेश आहे.