संतापजनक ! पाच लाखांच्या हुंड्यासाठी घेतले विवाहितेचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 19:41 IST2021-01-29T19:36:18+5:302021-01-29T19:41:08+5:30

dowry, murder news सासरच्या मंडळींनी चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये घेऊन ये असा तगादा लावला होता.

Annoying! The life of a married woman taken for a dowry of five lakhs | संतापजनक ! पाच लाखांच्या हुंड्यासाठी घेतले विवाहितेचे प्राण

संतापजनक ! पाच लाखांच्या हुंड्यासाठी घेतले विवाहितेचे प्राण

ठळक मुद्दे पती, सासु, सासरे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल 

कडा ( बीड) :  चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये घेऊन ये असा तगादा सासरच्या मंडळीने विवाहीतेकडे लावला होता. तिने पेसे न आणल्याने पती, सासू- सासरे यांनी संगनमत करुन विवाहितेचा खून केल्याची घटना सांगवी पाटण येथे घडली. सुवर्णा कैलास खिलारे ( 30 ) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना 23 डिसेंबर 2020 रोजी मध्यरात्री  घडली होती. याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील सुवर्णा कैलास खिलारेला सासरच्या मंडळींनी चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये घेऊन ये असा तगादा लावला होता. तिने यास नकार दिल्याने पती, सासु-सासरे यांनी संगनमत करुन तिच्या डोक्यात जड वस्तुने वार केला. यात गंभीर जखमी झालेल्या सुवर्णाचा 23 डिसेंबर 2020 रोजी मध्यरात्री मृत्यू झाला. या प्रकरणी गुरुवारी सतिश श्रीराम सुळे ( रा. लुखा मसला ता.गेवराई ) यांनी पोलीस स्थानकात  फिर्यादी दिली. यावरून पती कैलास श्रीमंत खिलारे ( 36 ), श्रीमंत नामदेव खिलारे ( 55 ) , शकुंतला नामदेव खिलारे (49 रा. सागवी पाटण ता. आष्टी ) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे,  पोलिस निरीक्षक सलिम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली  पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक  योगेश कुर्हाडे करीत आहेत.

Web Title: Annoying! The life of a married woman taken for a dowry of five lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.